उदाहरण क्र.१
माझ्या मामाची दोन्ही मुलं अगदी खेड्यात वाढली.नेहमीची सहा किमी.ची पायपीट करून शाळेत जात असतं.कारण बस,रिक्षा साठी पैसा खर्च करण्याची ऐपत नसे.शिवाय बस चा पास काढून नेहमी प्रवास करावा म्हटलं तर बस ची वारंवारता नसे.आई वडील पाचवी,सहावी पर्यंत शिकलेले.घरात अभ्यासाचे वातावरण शून्य.
बरं,एक वेळ सकाळची पायपीट ठीक समजू मात्र शाळा सुटल्यानंतरची उपाशी पोटी भर उन्हात ली पायपीट करणं हे भयंकर. मात्र ती ही न तक्रार करता हसत खेळत ही मुलं करीत.कोणत्याही प्रकारच्या खाजगी शिकवण्या नाहीत ना कोणत्याही प्रकारचं कुणाचं मार्गदर्शन.शाळेत शिक्षक जे शिकवतील त्याच जोरावर ह्यांचा सर्व अभ्यास होई.मला तर फार कमाल वाटे ह्या साऱ्याची.माझं सुट्टीत वगैरे मामाच्या गावी जाणं होत असे तेव्हा संध्याकाळ नंतर ही दोन्ही मूलं एका ठिकाणी बसून त्यांचा अभ्यास करीत असत.मला विशेष कौतुक वाटे.एके ठिकाणी जबरदस्ती अभ्यास करा रे असे दिवसभर ओरडून सांगणारे पालक मात्र तरीही अभ्यासाला न बसणारी मुलं आणि दुसरीकडे ही अशा पालकांची मूलं.किती जबरदस्त तफावत म्हणावी ही.अगदी तुटपुंज्या गरजा.कसली तक्रार नाही.राग राग नाही.त्रागा नाही.अजाणत्या वयात आलेली ही अक्कल.ह्या दोन्ही मुलांनी दहावी व बारावीत चांगले गुण मिळवत यश संपादन केलं. ह्या गोष्टीला आता तीन ते चार वर्षे झालीत.त्यांचं आता पुढील शिक्षण चालू आहेच.आता तर आणखीन परिपक्व झाली असतील ही मुलं.फक्त चांगले गुण मिळविणे ही एकच गोष्ट नसून त्या जोडीला एक प्रकारचे शहाणपण देखील येणं हे फार महत्वाचं असतं.आयुष्यात टिच्चून उभं राहण्यासाठी ते गुणांएवढं किंबहुना किंचित त्याहीपेक्षा महत्वाचं असतं.आणि ह्या दोन्ही गोष्टी अशा प्रकारची मुलं ही हासिल करत असतात.म्हणून आयुष्यात ही सर्वांपेक्षा दोन पाऊलं पुढेच असतात.

उदाहरण क्र.२
मला असं वाटतं की बेताच्या आर्थिक परिस्थिती पेक्षा जे भयंकर आहे,ती म्हणजे कुटुंबाची मानसिक अवस्था,परिस्थिती.जेथे अगदीच आर्थिक बाबतीत उदासीन परिस्थिती नाहीये,परंतु अशिक्षित पालक आहेत,शहरात रहाणं आहे.परंतु अशा ह्या परिस्थितीत देखील माझ्या परिचयात असलेल्या एका कुटुंबातील मुलाला मी ओळखतो.की ज्याच्या घरी मानसिक आव्हानं जबरदस्त आहेत.आपण कल्पना करू शकत नाही एवढं कमालीची उलतापालथीची मानसिक अवस्था रोज येणारी नवी आव्हानं, हे सारं पेलण्यासाठी किती जबरदस्त ताकदीचं मन लागत असेल ही मी कल्पनाच नाही करू शकत.बरं ही मनातील घालमेल इतर जगाला न दाखवणं,आपली दुःख गोंजारत न बसणं,किंबहुना इतरांना ती कवटाळू न देणं. हे सारं अचंबित करण्यासारखं.मला जेव्हा त्या मुलाची कौटुंबिक पार्श्वभूमी काही कारणास्तव समजली तेव्हा मी तर उडालोच.जबरदस्त हादरा बसला.मनोमन सलाम केला त्याच्या हिमतीला आणि ह्या अशा प्रकारच्या आव्हानाला सामोरं जाण्याची त्या आजाणत्या वयातील त्याची क्षमता बघून.धाडकन जमिनीवर कोसळलो.स्वतःचीच लाज वाटू लागली.छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करणं, अथवा छोट्या छोट्या गोष्टींनी बहरून जाणं ह्या गोष्टी तात्काळ मनातून काही क्षणात उतरून गेेल्या.आपण कुठे आहोत?काय करतोय?ह्याची जाणीव झाली.आणि हे कायमचं अंगी भिनलं.(त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टींचं कौतुक,बागुलबुवा करताना मन दहा वेळा विचार करतं.)
त्या मुलाच्या शाळे बद्दल समजलं.अगदी पहिली पासून मुलं अत्यंत घाणेरड्या शिव्या देण्यात पटाईत.शाळेतील वातावरण देखील गंभीर.अशा विदारक परिस्थितीत दहावीला 88% गुण मिळवून शाळेत प्रथम.(ह्या गोष्टीला पाच वर्षे झाली असावीत.)त्यानंतर यशाच्या एकेक पायऱ्या पादक्रांत करत आहेच तो.तथाकथित प्रसिद्ध,आणि मळलेल्या वाटेवरून न जाता स्वतःला आवडलेल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा त्याचा इरादा आहे.सध्या ते तो करीत देखील आहे.लवकरच आपल्या देशाच्या समोर त्याचं नाव मानानं घेतलं जाईल ही माझी खात्री आहे.(त्याच्या घरातील सर्व विदारक परिस्थिती मी इथे मांडली नाहीये.फक्त त्याचा सारांश मांडलाय.कारण त्याला ते आवडलं नसतं. स्वतःचे दुःख वाटत फिरावं ह्या विचारसरणीचा नाहीए तो. )

उपरोक्त दोन्ही उदाहरणांतील परिस्थिती भिन्न आहे.अशा ह्या भिन्न भिन्न परिस्थितीना विचारात घेणं गरजेचं आहे.आपला आर्थिक कमकुवतते बाबत नेहमीच एक 'सॉफ्ट कॉर्नर' असतोच.परंतु कठीण मानसिक अवस्थेचा देखील तितकाच विचार करावा असं माझं मत आहे.
काल दहावीचा रिझल्ट लागला.सगळीकडे कौतुकाचे मेसेजेस पाहिले अगदी 70 टक्के मिळविण्याऱ्यांपासून 95,100 टक्के मिळविण्याऱ्याचे कौतुकाच्या पोस्ट्स पाहिल्या.(साधारणतः माझ्या दहावीच्या वर्षांच्या नंतर च्या दोन वर्षात हे मार्क्स वाटण्याचं प्रमाण वाढलं.म्हणजे किमान 10%वरचढ झाले असावेत..त्यामुळे आजकाल मुलांना जे टक्के मिळतात त्यात मी त्यांचे 10 टक्के वजा करून जे उरतात तेच त्यांचे खरे टक्के हे गृहीत धरतो.)मिळालेल्या गुणांचे इथे फेसबुक वर कौतुक करणे वगैरे ठीक त्या अनुषंगाने लिहिलेलं वाचायला मिळतंय.
मात्र समाजात अशीही काही मुलं आहेत जी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन यश संपादित करतात.
सारं काही अनुकूल परिस्थिती असून मिळवलेलं यश वाटत फिरण्यात आनंद तो कोणता?त्यापेक्षा समाजातील अशी काही उदाहरणं शोधून ती सर्वांसमोर आणली जावीत.नेहमी स्वतःच्याच पाल्याबाबतच कौतुकाच्या पोस्ट टाकणं हे बंधनकारक नाहीए. त्याहुन कितीतरी मोलाचं आहे ते अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झगडत यश संपादन करित असलेल्या त्या मुलांना हुडकून काढणं.कौतुकानं त्यांची पाठ थोपटण.
आज समाजात अशी काही मुलं आढळतात त्यांच्याकडून पूर्ण आयुष्य कसं जगावं ह्याचे धडे घेता येतात.

सुमन दाभोलकर.
नुकताच माझ्या गावी कोंकणात जाऊन आलो.आजतागायत तळ कोंकणातील जी जी ठिकाणं पाहीली नव्हती अशी सर्व ठिकाणं पहायची असा निर्धार केला होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'वेंगुर्ला' हे माझ्या मूळ गावच्या शेजारचे शहर.मी वेंगुर्ल्या शेजारील सर्व ठिकाणं फिरून काढली.सोबत चित्राकरीता जे साहित्य लागेल ते घेतलंच होतं. जिथे मनाला भावेल त्या ठिकाणी बसून चित्रं देखील काढली.
फार सुंदर सुंदर नयनरम्य दृश्य आहेत माझ्या गावात.सर्वत्र निसर्गाने अगदी मुक्त हस्ते उधळण केलीयं.गावाला समुद्र किनारे लाभले असल्याकारणाने तिथलं सौन्दर्य तर वर्णन करण्यापलिकडचे आहे.त्या ठिकाणी जाऊन तासनतास निवांत बसावे,अशी भुरळ ज्याच्या मनाला नाही पडणार तो विरळाच.
अशी ही सारी दृश्य एका कलाकाराच्या मनाने,डोळ्याने अनुभवली.तिथल्या प्रत्येक ठिकाणावरचा अनुभव शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे.समुद्राच्या पाण्यातील,वाळूवरील,लाटांतील,आकाशातीलं,झाडांतील,झुडुपांतील,हे सारे रंग मनाला फार काही देऊन गेले.किती रंग असावेत निसर्गात!हे सारं कमालीचं आल्हाददायक.
हि सारी ठिकाणं फार प्रसिद्ध नाहीयेत.फारशी कुणाला माहित देखील नसावीत.बहुधा हेच त्यांचं सौदर्य अबाधित असण्या मागचं रहस्य असावं.
अशा विविध ठिकाणी जाऊन पहावं.डोळ्यांना प्रत्येक गोष्टीत सौन्दर्य पाहण्याची सवय आपसूकच जडेलं.
प्रत्येकानं अशी छोटी छोटी ठिकाणं अनुभवायला हवीत.परंतु आपण मात्र मागे लागतो ते तथाकथित प्रसिद्ध ठिकाणांच्या.इतरांनी जबरदस्ती दिलेलं उसनं सौन्दर्य घेऊन.

मी फेब्रुवारीत भारतात येतोय.त्या दरम्यान तुझा कुठे पेंटींग चा डेमो असेल तर नक्की सांग. मला तुझा डेमो बघायचाय. तुला भेटायचं हि आहे.तू चित्रकार म्हणून ताकदीचा तर आहेस शिवाय तुझं लिखाण हि अप्रतिम आहे.तुझा मोबाईल नं. देऊन ठेव भारतात आलो की मी स्वतः तुझ्याशी संपर्क साधेन.असा मेसेज मला एका व्यक्तीने फेसबुक वर पाठवला.(हे सारं वाचून मला आश्चर्यच वाटलं हो.साला हल्ली विना फायद्याचं एवढं कौतुक कुणी करत नाही.)हि व्यक्ती म्हणजे 'डॉ.अरुण दाभोलकर'.
सर शास्त्रज्ञ आहेत.'ब्रेन रिसर्च' मध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलंय.अमेरिकेतल्या 'शिकागो' येथे ते वास्तव्यास असतात.
सरांची आणि माझी ओळख झाली ती फेसबुक वर.(आडनावात जरी साम्य असलं तरीही आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो.)सर छंद म्हणून चित्रं काढतात.तसेच फोटोग्राफी देखील करतात.

ठरल्याप्रमाणे सर फेब्रुवारी महिन्यात मुंबईत दाखल झाले.एकेदिवशी अचानक सरांचा मला फोन आला.हॅलो.....हेय सुमन....मी अरुण...अरुण दाभोलकर.( अमेरिकन इंग्लिश ऍक्सेन्ट मध्ये ).मला क्षणभर कोण बोलतोय हे कळेचं ना..काही क्षणानंतर माझ्या लक्षात आलं की अरुण सर बोलताहेत.(कारण हा फोन अनपेक्षितरीत्या आला होता.)सर..समोरून... बरं वाटलं तुझा आवाज ऐकून.मी ...मला ही फार बरं वाटलं सर.मी काही दिवसांसाठी गोव्यात जातोय तिथून आल्यावर पुन्हा तुझ्याशी मी संपर्क साधेन,मला तुला भेटायचंय.(अरुण सर फोन वर बोलत होते.)हो सर चालेल पण आल्यावर नक्की फोन करा.असे बोलून मी फोन ठेवला.हि एवढी मोठी व्यक्ती आणि ह्यांनी मला अगदी आठवणीनं भारतात येऊन स्वतः फोन केला ह्या गोष्टीचं मला फार नवल वाटलं होतं.मी अगदी आनंदून गेलो होतो.
काही दिवसांनी सर गोव्याहून परतले आणि त्यांनी माझ्याशी पुन्हा संपर्क साधला.त्यावेळेस सर काही कामानिमित्त ठाण्यातच(शहर) आले होते.मी हि ठाण्यातच होतो.तेव्हा आम्ही भेटायचं ठरवलं.सरांनी मला पाहताक्षणीच एक स्मितहास्य केलंं.मला ही फार बरं वाटलं सरांना पाहून.सातासमुद्रापार असलेलं एक अनोळखी व्यक्तीमत्व आज मला भेटायला आलं होतं.नंतर थोड्या बातचीती नंतर त्वरित सर म्हणाले आता पुढचा प्लॅन काय करायचा? कुठे जायचं डिनर साठी?मी म्हणालो सर तत्पूर्वी आपण प्रवीण झाला सरांच्या स्टुडिओवर जाऊ.कारण तुम्ही ठाण्यात आल्याचं मी झाला सरांना कळवलंय.(प्रवीण झाला सर आणि अरुण सर यांचीही ओळख फेसबुक वरीलच)त्यांनी आपणांस त्यांच्या स्टुडिओवर आमंत्रीत केलय.त्यावर अरुण सर म्हणाले ठीक आहे.चालेल.आपण जाऊ झालांच्या स्टुडिओवर.तसा मी त्वरित झाला सरांना फोन केला.झाला सर त्यावेळी त्यांच्या अतिमहत्वाच्या खाजगी कामात व्यस्त होते.तरीही ते म्हणाले की तुम्ही या माझ्या स्टुडिओवर मी पोहोचतो तिकडे.नंतर मात्र झाला सर स्वतःच त्यांची गाडी घेऊन आम्हांस् घ्यायला आले. (झाला सर म्हणजे ग्रेट माणूस..नेहमी दुसऱ्याच्या मदतीसाठी आवर्जून उभं असणारं व्यक्तिमत्व.)
आम्ही स्टुडिओवर पोहोचलो.अरुण सरांनी झाला सरांची चित्रं पाहिली.बरंच बोलणं देखील झालं आमचं.त्यानंतर डिनर साठी कुठे जायचं ह्या विषयी चर्चा सुरु झाली.शेवटी एक ठिकाण ठरलं.त्याठिकाणी आम्ही जाऊन गप्पांच्या सानिध्यात जेवणाचा अगदी मनमुराद आनंद घेतला.
अरुण सरांशी गप्पांदरम्यान कळलं की ते 75 वर्षांचे आहेत.सरांचं मूळ गाव आणि माझं मूळ गाव एकच.सरांनी मालवणी भाषेत काही वाक्य देखील बोलून दाखवली.मला तर फार आश्चर्य च वाटलं.चाळीस वर्षांपासून सर अमेरिकेत वास्तव्यास आहेत.परंतु सरांचं मराठी तर छान आहेच शिवाय मालवणीत देखील सर बोलले.त्यावर मी सरांना म्हणालो,सर, इथे तर काही वर्षच मुंबईत येऊन झालेले माझे गावाकडचे मित्र मालवणी भाषा बोलणे हे कमी पणाचे मानतात.त्यांना त्याची लाज वाटते.परंतु त्या बिचाऱ्यांना ना धड मराठी बोलता येत ना धड मालवणी.अशी केविलवाणी अवस्था.सर हे सारं ऐकून हसू लागले.मी त्यांना म्हणालो सर,आपल्याकडे निव्वळ भाषे वरून माणसाची हुशारी ओळखली जाते.(ह्याचीच लाज वाटते.)म्हणून ह्यांना अमुक एक भाषा बोलणं हे मागासलेपणाचं लक्षण वाटत असावं.
सरांना मी त्यांच्या काही पूर्वीच्या गोष्टींबाबत बोलतं केलं,सर,आपल्याकडे संशोधन क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा कमी आहे.भारतात शिक्षण हे फक्त पैसा कमवण्यासाठीच घेतलं जातं.असं आपणांस वाटत का?तुम्ही ठरवून शास्त्रज्ञ झालेत का? अशा प्रश्नांची सरबत्तीचं मी सरांसमोर लावली.सर हो म्हणाले.आपल्याकडील लोकांची मानसिकता बदलण्यास फार काळ जाईल असं ते म्हणाले.नाही रे मी ठरवून वगैरे काही शास्त्रज्ञ झालो नाही उलट मी जेजे स्कुल ऑफ आर्ट मध्ये गेलो होतो प्रवेश घ्यायला.मला चित्रकलेची फार आवड होती.परंतु काही कारणास्तव मला प्रवेश मिळाला नाही.(हे ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला.)मग मी रीतसर विज्ञान शाखेत कॉलेज केलं.त्या कॉलेज तर्फे मला एक शिष्यवृत्ती मिळाली व मला जर्मनी ला जायची संधी मिळाली.तिथे जाऊन मी काही गोष्टींमध्ये संशोधन केलं. त्या नंतर अमेरिकेत गेलो व तिथेच स्थायिक झालो.आता चाळीस वर्षं झाली रे.मग पुन्हा भारतात यावं अस नाही वाटत का?(मी प्रश्न केला.)नाही रे मला भारतात आता नाही करमणार.मी स्वच्छंदी आयुष्य जगणारा प्राणी आहे.अगदी मला हवं तसं आयुष्य.सरांच्या बोलण्यातून त्यांचं व्यक्तिमत्व,विचार,हे सारं झळकत होतं.मी ताकदीचा कानसेन असल्या कारणाने त्यांचे बोल अगदी तन मन लावून ऐकत होतो.
फार काही शिकता येतं अशा माणसांकडून.आयुष्य आपल्या मर्जीने जगणारे,स्वतःच्या क्षेत्रात जी जान देऊन झटणारे,विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे परंतु तितकेच चांगल्या मनाचे,नेहमी जमिनीवर पाय ठेवून असणारे,'डाऊन टू अर्थ'. एवढी मोठी व्यक्ती परंतु चुकूनही त्यांच्या देहबोलीतून ते जाणवू न देणारे अगदी साधे पणाने वावरणारे 'डॉ.अरुण दाभोलकर' सर काहीतरी विशेष जाणवलं ह्या माणसात.अशी माणसं माझ्या संपर्कात येत आहेत हीच माझी संपत्ती.
शेवटी एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही निघालो.
घरी गेल्यावर देखील माझ्या मनात ह्या व्यक्ती बद्दल चे विचार घोळत होते.तेवढ्यात अचानक मला आठवलं अरे मी तर सरांना भेट म्हणून काही दिलं नाही.कारण हे सारं अचानक घडलं होतं.शेवटी मी ठरवलं की सरांना त्यांचं एक पोर्ट्रेट बनवून द्यायचं,भेट म्हणून.त्याप्रमाणे मी फेसबुक वरून त्यांचा फोटो घेऊन त्यांचं पोर्ट्रेट बनवलं.(सॉफ्ट पेस्टल ह्या माध्यमात ) परंतु काही कारणास्तव मला त्यांना ते देता आलं नाही.म्हणून मी त्यांना मेसेज केला व त्या पोट्रेट चा फोटो देखील पाठवला.सरांचा रिप्लाय आला.त्यांना ते पोट्रेट फार आवडलं. केव्हातरी ते पोट्रेट मी अरुण सरांकडे पोचते करेनच.ह्या साऱ्याचा मला मात्र विलक्षण असा आनंद झाला.एका शास्त्रज्ञांचं चित्रं आज माझ्या हातून रेखाटलं गेल्याचं समाधान काही औरच होतं.

मे महिना म्हणजे शालेय परिक्षांच्या निकालांचा महिना.हल्ली बरेच पालक माझ्याशी संपर्क साधताहेत.कला क्षेत्रात जाण्यास उत्सुक असलेल्या पाल्यांच्या पुढील शिक्षणा संदर्भात.कुठे प्रवेश घ्यावा,कोणत्या कॉलेजात घ्यावा इत्यादी प्रश्नांचा ससेमिरा असतो.
ह्या सगळ्यावरून माझ्या कला क्षेत्रात प्रवेश मिळविण्याच्या जुन्या दिवसांच्या आठवणी जाग्या होताहेत.
दहावीत मला चांगले मार्क्स मिळाले होते.74 टक्के.तसा मला अभ्यासात रस नव्हताच म्हणा.शाळेत असताना आवड नसलेले विषय देखील जबरदस्ती दहा वर्षे शिकावे लागतात.हीच मोठी शोकांतिका.असो.घोकंपट्टी करून एकदाचे मार्क्स मिळवले होते.आई वडील खुश मुलाला 74 टक्के मार्क्स मिळाले म्हणून..आंधळा मागतो एक डोळा,देव देतो दोन..त्यातली त्यांची अवस्था झाली असावी.आता वेध लागले ते कॉलेज च्या प्रवेशाचे.मी शाळेत असताना 'अ' तुकडीत होतो.आठवी नंतर जी मुलं संस्कृत घेत होती ती मुलं 'अ' तुकडीत जात होती.हुशार मुलांची(अभ्यासात) तुकडी असा तिचा खाक्या असे.दहावीत माझे सर्व मित्र चांगले मार्क्स मिळवून पास झाले.पुढे जाऊन 'विज्ञान' शाखेत प्रवेश घ्यायचा निर्णय बहुधा सर्वांनीच घेतला.काही मोजके असावेत ते दुसऱ्या शाखेकडे वळले.लहानपणापासून मित्रांसोबत एकत्र राहायची सवय असल्याकारणाने आपसूकच प्रत्येकजण तो चाललाय तर मी हि जाईन असे म्हणून विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ लागले.आमच्या वेळी बहुधा फारसे पालक ठरवत नसावेत. मुलाला कुठे पाठवायचं ते.
असाच एके दिवशी मी कॉलेजात प्रवेश घ्यायला गेलो.कॉलेजच्या ऑफिसात जाऊन 'ऍडमिशन फॉर्म' घेतला.तो भरण्यासाठी कॉलेजच्या बाहेर असलेल्या मंदिरात जाऊन आम्ही काही मित्र बसलो.एकमेकांशी बोलू लागलो..अरे अमका सायन्स ला चाललाय,तमका भलत्याच साईड ला चाललाय.आपण काय करायचं?...एकमेकांच्या गप्पा.कोणती साईड घेऊन भविष्यात काय करता येते ह्याच काडीचंही ज्ञान आम्हा कुणालाही नव्हतं.'सायन्स' ला स्टॅंडर्ड फार होतं..'कॉमर्स' त्याच्या खालोखाल आणि 'आर्टस्' त्या नंतर...आम्ही आपलं उगीच मोठं मोठ्या गप्पा मारत होतो.शेवटी एकदाचं मी ठरवलं सायन्स च काही मला झेपणार नाही.आर्टस् कडे गेलो तर तिकडे लिखाण,पाठांतर भरपूर असतं,अस ऐकलं होतं.मग आता राहील काय तर कॉमर्स...चला कॉमर्स झिंदाबाद...एकदाचा फॉर्म भरला...घरी जाऊन सांगितलं कॉमर्स ला घेतोय ऍडमिशन.वडील म्हणाले अरे पण तू चित्रकला क्षेत्रात चं का नाही करिअर करत?तू चित्रं तर फार छान काढतोस,तुला आवड देखील आहे.त्यात काही पुढील शिक्षण करता येईल का?(मला चित्रकलेचे फार आवड होती अगदी लहानपणापासून.बऱ्याच चित्रकला स्पर्धांमध्ये मी आवर्जून भाग घेत असे)आम्ही कणकवली सारख्या निमशहरात(खेडेवजा शहर) राहत होतो त्यावेळी.चित्रकला क्षेत्र म्हणजे कशाशी खातात ह्याची जाणीव हि नव्हती.फक्त कागदावर चित्र काढणे,साइन बोर्ड रंगवणे,इत्यादी काम पेंटर लोक करतात हाच काय तो माझा त्या क्षेत्राबद्दल चा ज्ञानकोश होता.आई वडिलांनाही त्या क्षेत्राबद्दल ची माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता.आमच्या खानदानात तर दूर दूर वर कुणीही केव्हा ब्रश हाती घेतला नव्हता.बऱ्याचशा खटाटोपी नंतर माझं आर्ट कॉलेजात प्रवेश घ्यायचं ठरलं.कॉमर्स मध्ये प्रवेश घ्यायचं कधीच विरून गेलं होतं.
आर्ट कॉलेजात गेलो..तिथे स्थिर स्थावर व्हायचा प्रयत्न करत होतो.तिथलं वातावरण तर अगदीच भिन्न.हळू हळू तिथल्या बाबी समजू लागल्या. त्या वातावरणात रममाण होण्याचा प्रयत्न करू लागलो.सर्व मुलांमध्ये मी 'कोवळा'.एकदा काही सिनियर्स माझ्या वर्गात आले.आणि मला प्रश्न विचारू लागले.काय ? इकडे कसा काय तू?किती मार्क्स मिळाले होते दहावीत?मी म्हणालो 74%...सिनियर्स मधला एकजण...च्या आयचा घो...माझे शाळेतल्या दोन वर्षांतले मिळून देखील एवढे होणार नाहीत.आणि त्या सर्वांचा जोरदार हशा..येडा बिडा झालास कि काय रे? ह्या क्षेत्रात का आलास,एवढे चांगले मार्क्स मिळून देखील?जो तो हेच बोलू लागला.सारेजण बोलता बोलता स्वतःची टक्केवारी देखील बोलून दाखवत होते. सर्वांचे मार्क्स म्हणजे जेमतेम 50टक्क्यांपर्यंत च.मला ही काही समजेनासे झाले.मी मनोमन विचार करू लागलो.म्हणजे अभ्यासात गती नसलेले लोकच ह्या क्षेत्रात येतात कि काय?मग चित्रकलेत आवड असणे म्हणजे काय?त्या आवडीने ह्या क्षेत्रात भाग घेणारं असं कुणी नसतंच का?ह्या क्षेत्राला काही भविष्य च नाही का?अशा कैक प्रश्नांनी माझ्या त्या अजाणत्या मनाला जबरी मनस्ताप दिला.चूक केली का इथे येऊन? असे म्हणून नेहमी स्वतःचा राग करत असे.असेच एक एक कधीही न अनुभवलेले प्रसंग येत होते त्या वेळेस.एकदा असाच वर्गात काम करत बसलो असता,एक सिनियर आला.मला शिव्यांचे अर्थ विचारू लागला.मी त्यावेळी फारच सज्जन.कधीही तोंडी न शिव्या दिलेला मी.कारण एका सुसंस्कृत मध्यमवर्गात वाढलेला मी.वडील सरकारी नोकर,आई गृहिणी..बरं कुणाच्याही अध्यात मध्यात केव्हा पडायचं नाही,कुणाशीही भांडायचं नाही,कुणाला कधीही अपशब्द करायचा नाही इत्यादी मध्यमवर्गी संस्कार माझ्या वर झालेले.सुसंस्काराने ओतप्रोत भरलेला मी.त्या सिनियर मुलाने विचारलेले प्रश्न ऐकून मला तर घाम फुटला होता.बरं हे टाळावं कसं तेही कळत नसे.असे बरेच दिवस जात होते.मी प्रचंड दडपणात अडकलेलो. कुठे आलोय मी ?काय करतोय?काय होणार माझ्या भाविष्याचं?असे नानाविविध प्रश्न मला भेडसावत असत.लहानपणापासून विचारी वृत्ती चा स्वभाव होता.त्यामुळे फारच त्रास होई.एका वेगळ्याच प्रकारचं मानसिक दडपण त्यावेळी यायचं.बरं मन मोकळं करायला आजूबाजूस कुणी हि नाही.शाळेतून कॉलेजात अगदी वेगळ्याच वातावरणात आलो होतो.एकदा वर्षाचा निकाल लागल्यानंतर काही मुलांकडून पार्टी आयोजित करण्यात आली.सर्व जण रात्री जमून पार्टी करणार असं ठरलं.मी हि गेलो त्या पार्टी ला.एखादी गोष्ट आवडत नसेल तर मी ती करायचो नाही परंतु तसे करणाऱ्यां सोबत मात्र मी राहत असे.कारण त्यांच्या सोबत राहून मिळणारे अनुभव मला घ्यायचे होते.बरं त्यात आणखी एक बाजू म्हणजे दंगा,मस्ती करणाऱ्या मुलांसोबत राहीलं कि तुम्ही सेफ असता.तुम्ही टार्गेट नाही होत.हे हि एक कारण असायचं.पार्टी रंगात आली सर्वजण फुल टाईट. मी एकटाच त्या वातावरणात एका कोपऱ्यात बसलेलो.सर्व माझे ज्युनियर पण फुल फॉर्मात. माझ्या पेक्षा वयानं लहान मुलं माझ्यासमोर एक एक उचापती करत होत्या.तरीही माझा इगो काही दुखावला जात नव्हता.मी आपला शांत च.असेच एका मागून एक दिवस निरनिराळे अनुभव देऊन जात होते.मनाची एक प्रकारची वेगळीच अवस्था त्यावेळेस होती.मनात एक विचित्र घालमेल चालूच असे.जे काही करायचं ते अगदी मनापासून करायचं.त्यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरीही त्याची फिकीर नाही.परंतु जे व्हावं ते भव्य दिव्य व्हावं अशा विचारांचा मी लहानपणापासूनच होतो.परंतु इथे माझ्या बाल मनावर एकावर एक आघात होतच होते.की मी कुठे अडकलोय?व्यक्त हि करता येत नव्हतं.आता जे होईल त्यास सामोरं जायचं असं मनोमन मी ठरवून आलेला दिवस मार्गी लावत होतो.मात्र घरी काहीही ह्या गोष्टींचा थांगपत्ता देखील मी लागू दिला नव्हता.कारण आईवडिलांना ह्या गोष्टीचा जबरदस्त त्रास झाला असता.त्यांनी मला माझ्या आवडत्या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहनच दिलं होतं.तेव्हा पासून च ठरवलेलं.चित्रकलेत चांगलं करिअर करायचं.इथे येत असलेल्या विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे ती बद्दलवायस हवीच.हि पक्की खूण मी गाठीशी बांधली.अत्यंत वाईटातुन वाईट परिस्थिती आली तरी झगडायचं. प्रत्येक परिस्थितीचा अनुभव उराशी सामावून घेत जायचं.आजतागायत तेच करतोय.आतापर्यंत बरेचसे अनुभव गाठीशी आलेत.पुढेही येतच राहतील.स्वतः मात्र तयार राहायचं.लहानपणात आलेल्या ह्या अनुभवांनी शहाणपण दिलंय.परंतु कधी कधी वाटतं अजाणतेपणी च जाण आली.परंतु ती ही न दाखवता आजूबाजूस वावरावं लागत.ते कसब अंगी आपसूकच जडलयं.
असो लिहिण्यासारखं बरचं आहे.आर्ट कॉलेजेस् चे अनुभव तर भीषण होते.(इथे मी फारच मोजक्या गोष्टी नमूद केल्या आहेत.)तूर्तास थांबतोय.
आजकाल माझ्या संपर्कात असे हि काही पालक आहेत की ज्यांची मूलं सध्या सातवी,आठवीत शिकताहेत.परंतु त्यांनी बारावी झाल्यानंतर काय काय करावे ह्याचं प्लॅनिंग पालकांनी आताच करून ठेवलंय.त्या प्रमाणे ते पुढची सूत्रं हलवताहेत.हे सारं बघून कधी कधी स्वतःचीच दया येते.ना कसलं मार्गदर्शन ना कुणाची मदत.स्वतःच चाला,स्वतःच आदळा,आदळल्यावर स्वतःच औषध शोधा ते जखमेवर लावा,आणि पुन्हा चालू लागा.हि आजतागायत ची परिस्थिती.'एकला चलो रे'..

आजच काही पालकांशी बोललो म्हणून त्या अनुषंगाने ह्या आठवणी जाग्या झाल्या.शाळा संपल्यावर मुलाला पुढील शिक्षणासाठी कुठे टाकावं? ह्या प्रश्ना मागची तळमळ मी चांगलीच जाणून आहे.आजही कला क्षेत्रात प्रवेश करण्यासंबंधी चा प्रश्न समोरून आल्यावर अंगावर नकळत काटा येतो.
सुमन दाभोलकर.
गेल्या शनिवार आणि रविवार ह्या दिवशी ठाण्यातील 'स्मार्ट हब'ह्या माझ्या (प्रोफेशनल ड्रॉईंग आणि पेंटिंग) संस्थे मार्फत चित्रं प्रदर्शन भरविले होतं. अगदी लहान ते थोरांपर्यंतच्या सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांची चित्रं त्या प्रदर्शनात सहभागी होती.मी विशेषतः पंधरा वर्षांवरील मुलांनाच चित्रकला शिकवतो.लहान मुलांसाठी वेगळे कला शिक्षक कार्यरत आहेत आमच्या संस्थेत.सर्व विद्यार्थ्यांची चित्रकला लोकांपर्यंत पोहोचावी त्यांना त्यातून प्रोत्साहन मिळावं, तसेच सर्वसामान्य जनतेला देखील चित्रकलेत किती प्रकारचे विषय असतात,कोणकोणत्या प्रकारची चित्रं काढली जातात,प्रत्येक विद्यार्थ्यांची निराळी शैली,पद्धती पाहायला मिळाव्यात,तसेच समाजात कलेची जाणीव वाढीस लागावी हा प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे प्रदर्शन छोटेखानी स्वरूपात करण्याचं ठरविलं होतं.परंतु त्याला अतिशय उत्तम म्हणावा असा प्रतिसाद कला रसिकांकडून लाभला.
प्रसिद्ध स्ट्रक्चरल इंजिनिअर श्री.प्रमोद सहस्रबुद्धे सर(जे छंद म्हणून चित्रकारिता देखील करतात.) ह्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उदघाटन करण्यात आलं.
मी फाईन आर्ट ह्या क्षेत्राबद्दल उपस्थित प्रेक्षकांस मार्गदर्शन केलं.हॉल पूर्णपणे प्रेक्षकांनी भरला होता.सर्वांशी मी संवाद साधला.त्यावेळी मला अशी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तिथे आलेले पालक,विद्यार्थी,इतर सामान्यजन ह्यांचे प्रश्न हे फार बेसिक होते,ह्याचा अर्थ हा कि ह्या क्षेत्राबद्दल समाजात कमालीची अनभिज्ञता आहे.प्रेक्षकांतुन बरेचजण असं हि म्हणाले की चित्रकला ह्या क्षेत्रासंदर्भात वर्तमान पत्रातून लेख,माहिती इत्यादी हे यायला हवेत,त्यातून समाजातील कलेविषयक जाणीव वाढीस लागण्यास मदत होईल.
त्या नंतर मी एक निसर्गचित्र प्रात्यक्षिक केलं.प्रात्यक्षिक पूर्ण होईपर्यंत सभागृहात कमालीची शांतता होती.लहानांपासून थोरांपर्यंत असे विविध वयोगटातील सारे लोक उपस्थित होते.कुणीही हु कि चू देखील करत नव्हते.सर्वजण मग्न होऊन त्या प्रात्यक्षिकाचा अगदी मनमुराद आनंद लुटत होते.
त्यानंतर प्रवीण झाला सरांनी त्यांचे मनोगत सर्वांसमोर व्यक्त केलं.एक कलाकार म्हणून त्यांचे अनुभव उपस्थितांस सांगितले तेही त्यांच्या विशेष अश्या खुमासदार शैलीत.तसेच इतर विद्यार्थ्यांनी देखील ह्या क्लास ,चित्रकला शिक्षणाविषयी चे त्यांचे अनुभव सांगितले.त्यावर प्रेक्षकांमधून विविध प्रकारचे प्रश्न मग त्यावर उत्तरं अशा पद्धतीने हा कार्यक्रम फार काही देऊन गेला.
ह्या दोन दिवसांत कित्येक लोकांची रेलचेल दिसत होती.रसिक मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट देत होते.त्यांच्या चेहेर्यावरील प्रदर्शन पाहतानाचे विस्मयचकित भाव पाहून मनास फार मोठं समाधान लाभत होतं.आम्हाला चित्रं म्हणजे एवढं काय काय असतं ह्याची जाणीवच नव्हती असे कित्येक जण मला बोलून गेले.आपण करत असलेल्या कामाची दखल घेतली जातेय हि जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात घर करत होती.त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं समाधान त्यांच्या चेहेऱ्यावर दरवळत होतं.
ठाण्यातील राजकारण,समाजसेवा, कला ह्या क्षेत्रांतील व्यक्तींनी प्रदर्शनास आवर्जून भेट दिली.प्रदर्शन पाहून निघता निघता ह्या व्यक्तींनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन म्हटलं तुझ्या सारख्या कलाकारांची समाजास नितांत गरज आहे.तू तुझ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी तर बजावत असतोसच,परंतु समाजातील कलेबद्दलचं ज्ञान,जाणीव वाढीस लागावी ह्या साठी देखील तू प्रयत्नशील आहेस त्या बद्दल तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमीच.असेच प्रयत्न चालू ठेव.तुझ्या संपर्कात आम्ही आता इथून पुढे राहुच.
सामान्य माणसांमध्ये जाऊन प्रदर्शन भरवण्यातलं समाधान मोठं मोठ्या कलादालनांमध्ये देखील नाही.ह्याची ह्या दोन दिवसांत प्रकर्षाने जाणीव झाली.
हे प्रदर्शन यशस्वी होण्यात एक 'टीमवर्क' होतं.सर्व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली त्यासाठी त्या सर्वांचे आभार.
हे प्रदर्शन फार अनुभव देऊन,आत्मविश्वास वाढवून गेलं.

सुमन दाभोलकर
अरे सुमन,येत्या बुधवारी आम्ही अलिबाग ला जाण्याचा बेत आखतोय.होडयांची शर्यत बघण्यासाठी.तू येणारेस का? प्रमोद सहस्रबुद्धे सरांचा एकेदिवशी अचानक फोन आला.सरांनी कुठे फिरायला जाण्यासाठीचं नियोजन जर का केलं असेल तर त्यांच्या सोबत जाण्याची संधी मी सहसा दवडत नाही.त्याप्रमाणे मी त्यांना होकार दर्शवला.मी,प्रमोद सहस्रबुद्धे सर,झाला सर,हनिफ भाई,देसाई सर,प्रमोद सरांचे इतर दोन मित्र असे सर्वजण मिळून अलिबाग ला जाण्याचं आम्ही ठरवलं.झाला सर,आणि प्रमोद सरांच्या गाडीतून जायचं असं ठरलं.त्याप्रमाणे पहाटे साधारणतः सहा वाजता आम्ही ठाणे शहर सोडलं.चार तासांच्या प्रवासाने आम्ही इच्छित स्थळी पोहोचलो.अलिबाग च्या शेजारी असलेल्या 'कोर्लाई' ह्या गावात.
प्रमोद सरांसोबत असलेल्या त्यांच्या मित्राच्या भावाचं ते गांव.तेही आमच्या सोबत मुंबईतून आले होते.त्यांच्या घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन आम्ही बाहेर निघालो.ती कोळी समाजाची वस्ती होती.एकमेकांशेजारी असलेली घरं,तिथली माणसं,बुजुर्ग व्यक्ती,त्यांचे पेहराव,हे पाहत पाहत त्यातल्या काही माणसांचे,घरांचे फोटो काढत. (माझ्या गळ्यात कॅमेरा टांगलेलाच होता.काहीजण मोबाईल द्वारा फोटो काढत होते.) आम्ही जिथे होडयांची शर्यत सुरु होणार होती त्या ठिकाणी पोहोचलो.
दरवर्षी गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या शिडाच्या होड्यांची स्पर्धा भरते.त्या वस्तीतील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा उत्साह जाणवत होता.त्यांच्या साठी जणू तो एक सण च असावा.
(शिडाच्या होड्यांमध्ये पंधरा ते वीस लोक असतात.ती होडी हाकण्यासाठी.त्या होडीला वल्हे नाहीत,मोटार नाही की आणखीन कोणतही साधन नाही.होडी फक्त वाऱ्याच्या अंदाजवर पळवावी लागते.सारचं कमालीचं अद्भुत,अचंबित वाटावं असं.कित्येक अंतर पार करून खाडीस दोन फेऱ्या मारून ह्या साऱ्या होड्यातली एक होडी विजेती ठरणार होती.)
जिथून शर्यती साठी होडया निघणार होत्या त्या ठिकाणी होडयांची बांधणी चालू होती.आजूबाजूला अनेक होडया दिसत होत्या.प्रत्येकावर नानाप्रकारचे झेंडे दिसत होते.त्या वस्तीतील प्रत्येक मनुष्य लहानापासून अगदी थोरांपर्यंत असे सगळे होडीच्या कामात व्यस्त दिसत होते.मग यथावकाश काही स्त्रियांनी त्या शर्यतीत सहभागी होणाऱ्या होड्यांची पूजा केली.सूर्य माथ्यावर आला होता.इतर अनेक होड्या देखील दिसत असल्याने माझा समज असा होता की ह्या सर्व होड्या शर्यतीत सहभागी होणारेत.परंतु काही कालावधीनंतर असं समजलं की त्या सर्व होड्या ह्या मोटार असलेल्या आहेत.त्या फक्त प्रेक्षकांसाठी आहेत.आणि ज्या होड्यांची स्पर्धा आहे त्या शिडाच्या होड्या आहेत.त्या प्रमाणे तिथे असलेली एक शिडाची होडी हि शर्यतीसाठी रवाना झाली.त्यात काही माणसं बसून गेली होती.लगोलग त्यांच्या मागोमाग मोटार असलेल्या होड्या देखील निघाल्या.लहान मुलं,स्त्रिया,पुरुष,बुजुर्ग मंडळी,ढोल, ताशे,म्युझिक,बँड,स्पीकर अशाने प्रत्येक होडी हि खचाखच भरलेली होती.जसं जसं खाडीत पाण्यात जाऊ लागल्यावर चारही दिशांना अनेक होडया दिसू लागल्या. माणसांनी खचाखच भरलेल्या.हे सर्वजण शर्यतीत उतरलेल्या होडयाना प्रोत्साहन देण्यासाठी निघाले होते.अगदी वाजत गाजत,नाचत प्रत्येक होडी निघाली होती.काही माणसं बेधुंद होऊन नाचत होती.स्वतःच्या गावातल्या,वस्तीतल्या शर्यतीत उतरलेल्या होडीला प्रोत्साहन देण्यासाठी.'कोर्लाई' गावची एक होडी अशा शेजारील अनेक गावांनी आपापल्या होड्या शर्यती साठी सहभागी केल्या होत्या.
आम्ही एका मोटार असलेल्या होडीत बसलो होतो.साधारणतः तीस जण असू आम्ही त्या एका होडीत.अशा कित्येक होडया आजूबाजूला त्या खाडीत दिसत होत्या.अनेक होड्या एकत्र. निरनिराळे झेंडे लावलेल्या त्यात काही शिडाच्या होड्या असं एक विहंगमय दृश्य सभोवलतार दिसत होतं.हळू हळू साऱ्या होड्या रवाना होऊ लागल्या.त्या शिडाच्या होड्यांमागे.मध्येच एका बाजूला पाण्यात डुबकी घेत असलेले तीन,चार डॉल्फिन देखील आम्हा सर्वांना दिसले.होडीतील एक मनुष्य त्वरित उच्चारला.बघा बघा डॉल्फिन बघा.नशीब लागत त्यांना बघायला.त्यावर मी नशीब न मानणारा त्या गृहस्थाच्या तशा बोलण्याकडे पाहून,हसून त्या क्षणाचा मनमुराद आनंद लुटत होतो.सर्वत्र होड्याचं होड्या दिसत होत्या माणसांनी भरलेल्या,विविध गाण्याच्या चालीवर ठेका धरीत नाचत गाजत असलेले सर्व अतिशय मनमोहक वातावरण,विलक्षण अनुभव होता तो.
जशी स्पर्धा सुरू झाली तसा होडीतील एकजण म्हणाला अरे सर्वांनी आपली ती होडी पहा.अचानक साऱ्यांच्या नजरा त्या होडी कडे वळल्या.जिच्या प्रोत्साहनपर आम्ही सर्व त्या शर्यतीत सहभागी झालो होतो ती होडीच वाऱ्याच्या धक्क्याने उलटली होती.होडीतल्या शिडाचा आधार असलेला लाकडी खांब तुटला होता. शर्यतीच्या पूर्वार्धात अगदी काही क्षणातच आपली होडी पडल्याचं दुःख प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर दिसत होतं.(सपने तो सपने हि रह गए च फिलिंग.) मला देखील वाईट वाटलं.(साला आम्ही कलाकार.संवेदनशील मन ना.)त्यात एकजण म्हणाला आपल्या गावची अजून एक होडी आहे ह्या शर्यतीत सहभागी.चला थोडं हायसं वाटलं.
आयुष्यात प्रथमच असा विलक्षण अनुभव मी घेत होतो.माथ्यावर सूर्य आग ओकत होता.तरीही त्याची तमा न बाळगता आम्ही सर्वजण प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद लुटण्याचा प्रयत्न करत होतो.भर पाण्यात त्या मोटार असलेल्या होडीत कोणत्याही प्रकारच्या विना संरक्षणाचे आम्ही बसलो होतो.परंतु काही अघटित घडेल असा एकही विचार मनास त्यावेळी शिवला देखील नाही.सार लक्ष चौफेर दौडणाऱ्या त्या होड्यांवर्ती होतं.साधारणतः साडेतीन तास आम्ही पाण्यात होतो.
होडीत कोल्ड्रिंक्स,फरसाण, चिवडा,कलींगड असं नाना प्रकारचं खाद्य खायला मिळत होतं.खात खात शर्यतीचा आनंद प्रत्येक जण घेत होता.शर्यतीच्या उत्तरार्धात पुन्हा साऱ्यांच्या नजरा प्रत्येक होडीकडे निक्षून पाहत होत्या.नक्की कोण जिंकेल हे पाहण्यासाठीची उत्कंठा शिगेस पोहोचली होती.
शर्यत शेवटच्या टप्प्यात येताच सर्वात पुढे असलेली होडी हि 'कोर्लाई' गावचीच असल्याचं कळलं.पुन्हा एकदा आनंदाच वातावरण साऱ्या होडीत पसरलं.आमच्या वस्तीतली होडी जिंकली नाही म्हणून काय झालं आमच्या गावातली होडी च विजयी ठरेल हि भावना प्रत्येकाच्या तोंडून ओसंडत होती.
शेवटी मात्र कोर्लाई गावचीच होडी विजेती ठरली.शर्यत संपली आम्ही किनाऱ्याच्या दिशेने निघालो.एक विलक्षण अनुभव उराशी घेऊन आम्ही प्रत्येकजण किनाऱ्यावर उतरून परतत होतो. नंतर एका घरात आमची जेवणाची सोय केली होती.जेवणाचा यथेच्छ समाचार घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाची तयारी करायला निघालो.सारं सामान ज्या ठिकाणी ठेवलं होतं त्या ठिकाणी जाऊन सर्व आवरून एकमेकांच्या चेहेऱ्यावरील त्या विलक्षण आनंदाची देवाणघेवाण करीत आम्ही त्या गावातून निघत असताना शेवटी ज्याच्या घरी आम्ही जेवण केलं होतं त्या घरातील एक व्यक्ती आमचा निरोप घ्यायला आमच्या गाडी पर्यंत आला होता.त्याच्या चेहेऱ्यावर उदासीचे भाव स्पष्ट दिसत होते.शेवटी कारण विचारल्यावर तो म्हणाला..पण आमची होडी अशी उलटायला नको होती...फार वाईट वाटलं हो..त्याला झालेलं अपार दुःख मी समजू शकत होतो.वर्षातून एकदा येणारी हि स्पर्धा.कोळी बांधवांच्या वस्तीतील प्रत्येकाच्या भावना त्यात गुरफटलेल्याच असणार.ज्यांचं त्या होडीशी,पाण्याशी एक अतूट नातं असतं.आणि आज वर्षभर ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस असा निराशेने गेला तर असं दुःख न होणारा विरळाच.
मी मात्र आयुष्यात आणखीन एका विलक्षण अनुभवाची भर घालून त्या गावातून निघालो.

माझ्या एक स्टुडंट होत्या.(त्यांच्या आजारपणामूळे त्यांना पुढे क्लास चालू ठेवता नाही आला.)त्यांचे यजमान एकदम मस्त माणूस.नेहमी हसरा चेहरा,हसतखेळत असलेलं व्यक्तिमत्व.तितकेच मदतशीर ही.नेहमी व्हाट्सअँप च्या साहाय्याने माझ्याशी संपर्कात असलेले.दिवसाची सुरवात आणि ह्यांचा मला मेसेज आला नाही असं कधी झालंच नाही.
अचानक एके दिवशी ह्या गृहस्थांचा मला फोन आला.सर,मी बोलतोय.श्रीनिवास.बोलू शकतो ना?व्यस्त नाही आहात ना?मग फोनवर बोलणं झालं.त्यांच्या मित्राला एक चित्र करून हवं होतं.श्रीनिवास सरांच्या घरात एक फार जुना कृष्णाचा फोटो होता.कितीतरी वर्ष जुना.तो अगदी तसाच माझ्याकडून त्यांना चित्रस्वरूपात बनवून हवा होता.त्यांनी मला त्या कृष्णाचा फोटो मोबाईलवरून पाठवला.सर ह्याचे चित्र करण्याचे किती पैसे होतील तेहि सांगा.माझं च काम आहे असं समजा.मी त्यांना म्हणालो कि मी तुमच्या घरी येऊन प्रत्यक्ष तो फोटो पाहीन,माझ्याकडे प्रोफेशनल कॅमेरा देखील आहे.त्याने त्याचे फोटोज् काढीन. कारण तुम्ही मोबाईल वर जो फोटो पाठवलाय त्यातून फारसे बारकावे दिसत नाहीयेत.
त्याप्रमाणे श्रीनिवास सरांच्या घरी जाण्याचा योग आला.काही गप्पांच्या ओघानंतर भिंतीवर फ्रेमसहित टांगलेला तो कृष्णाचा फोटो सरांनी खाली उतरवला.मग मी त्याचे वेगवेगळ्या अँगल ने फोटोज् काढले.ते एक फार जुन्या चित्राची प्रिंट होती.बहुधा कुणातरी कलाकाराने काढलेल्या चित्राची प्रिंट असावी.नंतर ज्या गृहस्थांना ते चित्र करून हवं होतं ते म्हणाले ह्याला तुम्ही जी फ्रेम कराल ती ही लाकडी इफेक्ट असेल अशी असू द्या जास्त भडक,डोळ्यावर येणारा रंग नसावा फ्रेम चा,तसेच त्या चित्रांतले रंग सौम्य असू द्या इत्यादी बाबी त्यांनी मला सांगितल्या .ह्या वरून त्या गृहस्थांना सौन्दर्य दृष्टी होती हे तर मला दिसून आलंच.शिवाय मनात काम चांगलच झालं पाहिजे ही जाणीव पण वाढीस लागली.
नंतर मी हे चित्र अमुक दिवसांत करून देईन,जसं जसं काम होत जाईल तसतसे त्याचे फोटोज् तुम्हाला मोबाईल वर पाठवेन.त्यात काही बदल करावयाचे असल्यास त्या त्या वेळी मला सांगा असं मी श्रीनिवास सरांच्या मित्राला म्हणून तिथून निघालो.त्यानंतर बरेच दिवस चित्रं करण्यात गेले.त्या दिवसांत सरांचे काही फोन येऊन गेले.कुठपर्यंत आलंय काम?किती बाकी आहे अशा स्वरूपाचे ते फोन होते.
चित्र करायला घेऊन तर बरेच दिवस उलटलेत, परंतु अजून माझं चित्र पूर्ण होत नाहीये ह्याचे शैल्य मनाला वाटत होते.मुळात मला त्या चित्रातून अभिप्रेत असलेला मनाजोगता परिणाम मिळत नव्हता.स्वतःच्या मनाला जोवर तो अपेक्षित असलेला परिणाम साध्य झालाय असं वाटत नसेल तर मी कोणत्याही चित्रांचं काम पुढे सरकवतच नाही.किंबहुना माझं मन मला तसं करू देत नाही.जर मला अपेक्षित असलेलं समाधान चित्रातून मिळत नसेल तर माझं मन मला थाराच देत नाही.काहीतरी अपूर्ण आहे असं वाटत राहतं.परंतु समोरून तर फोन येत होते.सर कधी पाठवताय?वगैरे चे.काही दिवसांनी मनाजोगता परिणाम चित्रातून साधल्याचं जाणवलं.त्वरित मी त्याचा फोटो काढून त्यांना पाठवला.काही किरकोळ बदल समोरून करण्यास सांंगण्यात आले.त्याप्रमाणे मी ते करून शेवटी एकदाचं ते चित्र पूर्ण केलं.आणि घरपोच नेवून दिलं.चित्र विकत घेणाऱ्या त्या व्यक्तीला ते चित्र पाहून फार आनंद झाला.हे त्यांच्या चेहेर्यावरून स्पष्ट दिसत होतच.शिवाय त्यांनी भरभरून कौतुक देखील केलं.शेवटी एका चित्रकारासाठी ह्याहून मोठं समाधान ते कोणतं?मी हि मनातून खुश झालो.मेहनतीचं चीज झालंय हि भावना मनात आनंद करून गेली.मी केलेलं चित्र आता कुणाच्यातरी भिंतीवर लटकणार होतं.
माझा आजतागायत चा अनुभव असा की सर्वसामान्य माणूस हा तसा चित्र खरेदी करण्याच्या बाबतीत कमालीचा उदासीन.कशाला उगाच एवढा खर्च करायचा?आम्हाला कुठे परवडतय?हे रडगाणं नेहमीच ऐकू येतं.परंतु मी हे देखील पाहिलंय कि काही कलारसिक आहेत.त्यांना जबरदस्त कलेची जाण आहे.एखादी प्रिंट आणि चित्रकाराने केलेलं चित्र ह्यातली तफावत नेमका जाणणारा.त्यातलं सौदर्य जाणणारा.तसं पहावया गेल्यास प्रत्येक सामान्य माणसानं स्वतःच्या घरी एक छोटंसं चित्र लावणं हे सहज शक्य आहे.त्यात फार मोठी पैशाची उलाढाल करावी लागते अशातला देखील भाग नाही.परंतु मुख्य प्रश्न आहे तो हि जाण असणारा रसिक कितीसा आहे?एखाद्या चित्रकाराच्या प्रदर्शनाला भेट देवून त्याच एक छोटंसं चित्र विकत घेऊन पाहा.ते विकत घेतल्यावर त्या चित्रकाराच्या चेहेऱ्यावरचा आनंद पहा.त्यातून तुम्हाला जे समाधान मिळेल त्याचं मोल नाही हो कुठे.त्या चित्रकाराचं स्वतःच एक क्रिएशन,त्याची कला,त्याने तन मन लावून केलेलं काम ज्या वेळेस तुम्ही खरेदी करता त्यावेळेस एक अत्यंत विलोभनीय असा आनंद तुम्ही त्या चित्रकाराला देत असता.
परंतु दुर्दैवानं आपल्या कडचा समाज ह्या जाणिवांच्या पलीकडेच आहे अजूनतागायत.
हे फक्त सर्वसामान्याच्याच बाबतीत आहे असं नाही तर बुद्धिजीवी वर्गातही हीच उदासीनता मी पाहिलीय.मी दरवर्षी असाच एका बुद्धिजीवींच्या कार्यक्रमात स्वतःचा एक स्टॉल लावतो त्यात मी केलेली काही क्रिएटिव्ह रेखाटनं इत्यादींचा सहभाग असतो.परंतु काही अपवाद वगळता त्या स्टॉल कडे साधं कुणी फिरकत हि नाही.तुम्ही त्यातलं काही विकत नका घेऊ,निदान त्या चित्रकाराकडून जाणून तरी घ्यावं कि हे क्रिएशन कशा प्रकारे कागदावर उतरवलय,त्या मागची संकल्पना काय? वगैरे तत्सम प्रकारचे प्रश्न विचारावेत परंतु तेही घडताना दिसत नाही.ह्याला कारण कलेविषयीची असलेली अतिसामान्य जाण.आपला समाज कलेविषयी किती अप्रगल्भ आहे ह्याची कैक उदाहरणं मात्र वेळोवेळी दिसून येतात.
आज एका सर्वसामान्यच असलेल्या व्यक्तींनी माझ्याकडून चित्र करवून घेतलं त्यामुळे ह्या साऱ्या बाबी डोळ्यासमोर तरळल्या.

"बाकी इथे बरळूून काहीच हासील होत नाही कधी परंतु कुठेतरी वाट मोकळी करून द्यावी लागते मनातल्या जाणिवांना नाहीतर स्वतःलाच त्रास देत राहतात त्या."
सुमन दाभोलकर.
कामाच्या व्यस्ततेमुळे इतके दिवस प्रयत्न करीत असता देखील जेहांगीर दालनात जाण्याचा योग येत नव्हता.आज शेवटचा दिवस होता.म्हटलं कसही करून जमवायचच.त्याप्रमाणे आज जेहांगीर दालनात 'विजयराज बोधनकर' सरांचं चित्रप्रदर्शन पाहून आलो.दालनात जेव्हा शिरलो तेव्हा समोर महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मा.श्री.विनोद तावडे सर,विजयराज बोधनकर सर इतर लोक दिसले.विजयराज सर विनोद तावडेना त्यांची चित्रं दाखवून सोबत त्या चित्राबद्दलचं स्पष्टीकरण हि देत होते.सारी चित्रं उलगडून दाखवत होते.तावडे सर अगदी तितक्याच तन्मयतेने ऐकत देखील होते.वसुंधरेविषयीचं, ह्या ब्रह्मांडा बद्दल चं सार कविमन असलेल्या विजयराज सरांच्या प्रत्येक चित्रातून उलगडत होत.मी हि तात्काळ त्यांच्यात सामील झालो.ह्या निमित्ताने मला ही ती चित्रं आणखीन चांगली समजून घेता आली.आज योगायोग चांगला होता.
प्रत्येक चित्रं मी अगदी निरखून पाहिलं.त्यातला रसास्वाद घ्यायचा प्रयत्न मी करीत होतो.चित्र पाहताना मन गुंतत जात होतं,जणू हरएक प्रेक्षक माझ्यात तल्लीन झालाच पाहिजे हा चित्राचा अट्टाहास होता.प्रत्येक चित्र काहीतरी सांगू पहात होत.फक्त त्यासमोर उभं राहून त्याच्याशी संवाद साधणं गरजेचं होतं.आणि ते एकदा का झालं की मग त्या चित्रासमोरून निघणं कठीण होऊन जात होतं.ती ओढ,तो अनुभव बरचं काही देऊन गेला.
सर स्वतः कविदेखील आहेत.आणि त्यांच्यातल्या कविने साक्षात वसुंधरेला कवियत्री बनवून तिच्याशी घातलेला हा संवाद अविस्मरणीय,अवर्णनीय असाच होता.
असंच प्रत्येक चित्र समजावून सांगत असता अचानक विनोद तावडें सरांसोबत असलेल्या व्यक्ती विजयराज सरांना म्हणाल्या की, तुम्ही प्रत्येक चित्राखाली त्या चित्राबद्दल सविस्तर माहिती देणारा मजकूर का नाही जोडला? त्यावर लगेच विनोद तावडे सर देखील म्हणाले कि ज्याला चित्रं बघणं काय असत हे समजत नाही त्याने कसा अर्थ लावायचा ह्या चित्रांचा?त्यावर विजयराज सरांनी अगदी समर्पक उत्तर दिलं ते असं... "मी जर का तो मजकुर प्रत्येक चित्रासोबत जोडला असता तर चित्रं प्रदर्शन पाहायला येणाऱ्या रसिकांनी त्याच अर्थानं त्या चित्राकडे पाहिलं असतं. त्यात त्याची अनुभूती हि मी वर्णीत केलेल्या घटकांपूर्ती सीमित राहिली असती.परंतु मी तसं न केल्यानं प्रत्येक रसिक स्वतः त्या चित्राशी समरूप होऊन त्याचं मन चौफेर दवडू देत, कैक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारत,त्या चित्राशी संवाद साधेल त्यातून त्याला काहीतरी निराळं गवसेल जे कदाचित मलाही गवसलं नसेल".
हे सारं मी शांत चित्तानं ऐकत होतो.आज कान तृप्त झाले.एका वेगळ्या विश्वात आल्याचा अनुभव घेत होतो.मनातल्या मनात विजयराज सरांचे आभार मानत होतो.आज त्यांच्यामुळे मी एका वेगळ्या विश्वात न्हाऊन निघत होतो.एक चित्रकार विश्वाकडे इतक्या समृद्ध नजरेने बघू शकतो.स्वतःच्या चित्रातून अशा प्रकारे व्यक्त होऊ शकतो. ह्या गोष्टीचा आज मी स्वतः एक चित्रकार असल्याने अभिमान वाटत होता.
माझ्या पुढच्या कामामुळे मला जास्त वेळ दालनात थांबणं शक्य नव्हतं.त्याप्रमाणे मी सरांची अनुमती घेऊन निघत असता विजयराज सर मला म्हणाले तुझा अभिप्राय जरूर नोंदव.विनोद तावडेंच्या शेजारी मी माझा अभिप्राय नोंदवला.

"आज विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशिले".विश्वाची अनुभूती घेऊन मी बाहेर निघालो.
सुमन दाभोलकर.
काही दिवसांपासून ठरवलं होतं की 'पद्मश्री सुधारक ओळवे' सरांचं छायाचित्रं प्रदर्शन पहायचं.त्या निमित्ताने काल आवर्जून जेहांगीर कलादालनात गेलो होतो.जहांगीर दालनात शिरल्यावर उजवीकडे असलेल्या गॅलरीत जेव्हा शिरलो त्या वेळेस त्या ठिकाणी फार गर्दी बघायला मिळाली.मनाला थोडा आनंद देखील झाला कारण अशा दालनात सर्वसामान्य माणसं फिरकणं,त्यांच तिथे असणं हे फार आवश्यक आहे.नंतर हळू हळू मी प्रदर्शन पाहू लागलो.दलितांवर झालेल्या अत्याचारांवर आधारित अशी विविध छायाचित्रं त्या प्रदर्शनात मांडण्यात आली होती.प्रदर्शनातील छायाचित्रं तर अप्रतिम आहेतच,शिवाय त्या मागच्या कहाण्या तर काळीज चिरणाऱ्या.मी ज्या वेळेस सुधारक सरांचं प्रदर्शन पाहू लागलो त्यावेळेस मी जे छायाचित्रं पाहत होतो त्याच्या शेजारील छायाचित्र अचानक खाली येऊ लागलं.ते मागे डबल टेप ने भिंतीवर लावण्यात आल्याचं माझ्या लक्षात आलं होतं.म्हणून मी तात्काळ धावत जाऊन ते होतं त्याजागी सुस्थित लावलं.(आजूबाजूस कुणीही त्या फोटोंची खातरजमा करणारं आढळलं नाही.)थोडे पुढे गेलो तर एक विदेशी पर्यटक अतिशय गांभीर्यतेने एका फोटो शेजारील विश्लेषण वाचत होता.फार बरं वाटलं ते बघून.(मनात म्हटलं असे विषय हे सर्वांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत.)प्रदर्शन बघत बघत पुढे सरकत होतो.तोच एक छायाचित्र बघून दोन,तीन मुली त्यावर काही टिपण्या करत होत्या.....ह्यातली हि मुलगी तुझ्या सारखी दिसतेय वगैरे वगैरे......काही वेळानंतर मी त्या फोटोपाशी आलो त्यावरचं विश्लेषण वाचून तर मी अवाकच् झालो.(एका मुलीचा काही कारणास्तव खून करण्यात आला होता.त्या मुलीचं पूर्वीचं एक छायाचित्रं त्या ठिकाणी लावण्यात आलं होतं.आणि शेजारी माहितीपर मजकूर.)आणि त्या दोन,तीन मुलींनी मिळून ह्याच फोटोवर त्या टिपण्या केल्या होत्या.त्यां मुलींनी छायाचित्रा शेजारील तो मजकूर,विश्लेषण वाचलं नसेल हे तर नक्कीच.(कारण त्या साठी कुठे आलोय आम्ही ह्या दालनात?आम्ही तर फोटो काढायला आलोय.)हि आपल्या समाजातल्या लोकांची संवेदनशीलता?निदान आपण कोणतं प्रदर्शन बघायला आलोय,काय बघतोय ह्याचे तरी भान असावं.समाजात काय घडतंय ह्याच्याशी काहीच देणंघेणं देखील नाही.त्याविषयी काही करणं तर सोडाच किमान पातळीवर व्यक्त होणं देखील नाही,मनाला तसं काही जाणवणं देखील नाही?इतकी पराकोटीला गेलेली असंवेदनशीलता?
हे सगळं बघून तर मनात आणखीनच उदासीन विचार आले,चीड निर्माण झाली अशा ह्या लोकांची.त्या तिन्ही दालनातं मी फिरत होतो.लोकांची फार गर्दी खासकरून कॉलेजात जाणाऱ्या मुलामुलांची.प्रत्येकजण दालनातल्या चित्राला फक्त 'बॅकग्राऊंड' बनवू पाहत होते.फोटो काढणं चालू होत.सेल्फी काय,ग्रुप फोटो काय..सगळा नुसता धिंगाणा.सुशिक्षित असंस्कृतपणा चा मेळ सर्वांमधून दिसून येत होता.हे सारं पाहून खरंच आज आपण जेहांगीर दालनात आहोत का ? हा प्रश्न मनाला पडत होता.कारण ह्या दालनात हे सारं मी पहिल्यांदाच अनुभवत होतो.काळा घोडा उत्सवात आलेल्या ह्या साऱ्या झुंडीच्या झुंडी आज ह्या दालनात वळल्या होत्या.चित्रं अथवा तस्सम प्रदर्शनं कशी पाहावीत ह्याला सुद्धा काही नियम असतात.परंतु हे तर आमच्या गावीच नाही.आम्हाला दिसते ती फक्त माझ्या गुळगुळीत देहाला,चेहेऱ्याला हवी असलेली 'चित्ररूपी बॅकग्राऊंड'.
मला तर हे सारं सहन होत नव्हतं.सर्वात कहर म्हणजे त्या दालनात कुणी प्रदर्शना बाबत जबाबदार व्यक्ती देखील दिसत नव्हती.जबाबदार व्यक्तीच्या कानावर हे सारं घालण्यासाठी मी सर्वत्र फिरत होतो.जेणेकरून ह्या जत्रेवर काही बंधन घातली जावीत.त्यासाठी मी बाहेर जाऊन कुणी दिसतंय का हे देखील पाहिलं परंतु मला तिथे कुणीच आढळलं नाही.हताश होऊन,स्वतःशीच राग व्यक्त करत,वाईट वाटून घेत मी बाहेर निघालो.
म्हटलं आता आलोय तर काळा घोडा फेस्टिवल पाहुया.असे म्हणून त्या दिशेने निघालो. तर बाहेर सर्वत्र पुन्हा जत्राच.सगळी कडे फोटो काढण्यासाठी नुसती मारामारी.एकही कुणी असं आढळलं नाही की जे तिथे ठेवलेल्या इंस्टालेशन्स,कलाकृतीला अतिशय काळजीपूर्वक,अभ्यासपूर्वक न्याहाळतय,जाणून घेतंय.नुसती सेल्फी साठी,फोटो साठी धडपड.जे नीट बघणारे असतील त्यांनाही त्यामुळे नीट बघता येत नव्हतं.मला आता स्वतःचीच लाज वाटू लागली.का आलो इथे? का घालवला वेळ वाया?ह्या झुंडीना कोण आवरणार?कोण शिस्त लावणार ह्यांना?बघणं,जाणून घेणं,अनुभवणं ह्या गोष्टींशी काही संबंध, देणंघेणं नसणाऱ्या,सौदर्य हे फक्त देहापुरतं,चेहेऱ्यापुरत मर्यादीत असतं असं समजणाऱ्या ह्या झुंडीच्या झुंडी.हे सगळं आता माझ्या सहनशीलतेच्या बाहेर चाललं होतं.काही कालावधीतच मी तिथून तडक निघालो.
हा असाच अनुभव मी काही महिन्यांपूर्वी 'तारापोवरा मत्स्यालयात' देखील घेतला होता.मत्स्यालय आहे की मच्छी मार्केट हेच कळत नव्हतं.एखादी गोष्ट का,कशी बघावी ह्याच साधं ज्ञान देखील आपल्या(भारतीय) लोकांना नाही.
आज जेहांगीर दालन अथवा काळा घोडा फेस्टिवल ह्या मध्ये कॉलेजात जाणाऱ्या मुलांचं प्रमाण जास्त दिसत होतं.ह्या सर्व गोष्टींवरून हेच जाणवतंय कि ह्या मुलांना काय बघावं?कसं बघावं?का बघावं?कधी बघावं?ह्याच बाळकडू मिळालच नाहीये.ह्या समाजातील किती पालक आपल्या मुलांना जेहांगीर अथवा तस्सम कलादालनात घेऊन जात असतील?आपल्या शाळा,कॉलेजकडून तर अपेक्षा करणं देखील कठीण.हे जर का झालं असतं तर लहानपणापासूनच ते कसं बघावं ,का बघावं, ह्याच ज्ञान मिळालं असतं.मग आजच्या ह्या झुंडी काही वेगळं करताना दिसल्या असत्या.एका बाजूला फॅशन म्हणून म्हणा किंवा आपला मुलगा/मुलगी सर्वांपेक्षा वरचढ ठरावा म्हणून हजार प्रकारचे क्लासेस मुलाला लावले जातात.मात्र त्यात स्वतःच्या मूलाचा सर्वांगीण विकास कसा व्हावा ह्याकरिताचा क्लास जो घरातूनच घेतला जावा तो मात्र कुणी घेताना दिसत नाहीये.

तसा मी इंद्रजित दादा पेक्षा वयाने फारच लहान आहे. लहानपणी आम्ही दर संध्याकाळी क्रिकेट खेळत असू.घराशेजारी असलेल्या छोट्याश्या मैदानात साधारणतः आम्ही सात ते आठ गडी असू खेळणारे.ह्या सर्वात मी वयाने लहान.अगदी तिसरी,चौथी त असेन.बाकी सर्वजण दहावी,अकरावीत असावेत बहुधा.त्यात इंद्रजित दादा देखील असे,तेव्हा स्टंप म्हणून आम्ही कुठल्यातरी झाडाच्या फांद्या काठ्या म्हणून उभारत असू. ते स्टंप तर माझ्या छाताडा पर्यंतच्या उंचीचे असत.मी तसा सर्वांमध्ये कच्चा लिम्बु असे.आम्ही तेव्ह्हा नंबर लावून खेळायचो. सगळ्यात शेवटी माझा नंबर असे,कारण असं कि, सर्वांचे खेळून झालं कि मी काय एका चेंडूचा मानकरी! एका चेंडूत बाद होणार हि सर्वाना खात्री असे.तेव्हा विशेष म्हणजे मला बॅटिंग ची संधी आली कि इंद्रजित दादा कडे हमखास चेंडू सोपवला जाई.सर्वजण म्हणत इंद्रजित....ये रे बाबा बॉलिंग करायला ..तुझं गिऱ्हाईक आलंय बघ.असे म्हणून सर्वजण हसून दादा कडे चेंडू सोपवतं.दादा म्हणजे तेव्हा माझ्यासाठी खतरनाक बॉलर! अख्तर चं! त्यावेळी तो खूप वेगाने बॉलिंग देखील करत असे.खर सांगायचं तर तो बॉलिंग ला आला कि मला धडकीच भरायची. दादा उंचीनेही बराच मोठा माझ्यापेक्षा.तरीही मी जिवाच्या आकांताने खेळायचो.परंतु माझं धाडस मात्र वाखाणण्याजोगं असे.(सर्व माझ्या पेक्षा वयाने मोठे, बरं त्यात माझ्या वयाचा देखील कुणी नाही.म्हणजे तो हि लवकर आऊट होतो.ह्या गोष्टीचा नकळत आनंद,स्वतःला सहानुभूती देण्याचा प्रश्न च नव्हता.)त्याचा एक चेंडू जरी माझ्या बॅट ला स्पर्शून गेला तरी मी धन्य होत असे.दुर्दैवाने असा योगायोग फारच कमी वेळा आला म्हणा.दुसऱ्या किंवा तिसऱ्या चेंडूत मी बाद होत असे..तोही त्रिफळाचीत! क्लीन बोल्ड!
तेव्हा माझे आणि दादाचं फारसं बोलणं होत नसे कारण वयोमानामध्ये बरीचशी तफावत.दररोज संध्याकाळी खेळण्यापूरता संबंध येई.तोही एका बॉल पुरता.
त्यावेळेस आमच्या घरमालकाचा मुलगा, जो इंद्रजित दादाचा मित्र.दादाही त्याच भागात राहायचा.त्यामुळे एकत्र येऊन खेळणं वगैरे होत असे.परंतु कालांतराने आम्ही ते घर सोडून दुसरी कडे राहावयास गेलो.आणि तेव्हा भेटीगाठी होणं सगळं बंदच झालं.मात्र कित्येक वर्षानंतर अचानक दादाची आणि माझी एकेठिकाणी भेट झाली.तेव्हा मी वयाने बराच मोठा झालेलो तरीदेखील दादाने मला नावानिशी लगेच ओळखलं.माझ्या तर तो चांगलाच लक्षात होता म्हणा.मग गप्पांच्या ओघात दादाने माझ्या घरच्यांची विचारपूस केली. मग जुन्या आठवणी एकामागोमाग एक बाहेर पडू लागल्या.गप्पांच्या दरम्यान दादा म्हणाला मग सध्या काय करतोयस? कुठे असतोस? मग माझ्या शिक्षणाविषयी,प्रोफेशनविषयी दादा ला मी माहिती दिली.दादा भलताच खुश झाला हे ऐकून कि मी फाईन आर्ट केलंय.मग थोड्या गप्पांनंतर दादा ने त्याच्या प्रोफेशन विषयी माहिती दिली.म्हणाला माझा स्वतःचा व्यवसाय आहे. तसेच मी फोटोग्राफी देखील करतो छंद म्हणून..झालं त्या क्षणापासून आमच्यातल्या गप्पांना एक वेगळीच किनार मिळाली.मग दादाने मला त्याचं फोटोग्राफी च काम दाखवलं.मी माझी चित्रं दाखवली.ती एक 'कलाकारी' च्या संगमाची अनुभूतीच होती. अशी देवाणघेवाण झाल्यानंतर,बऱ्याच विषयांवर चर्चा झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं कि अरे...दादा तर मला समविचारी...मला खूप आनंद झाला ह्या गोष्टीचा.
मी कामानिमित्त मुंबईत जरी असलो तरी गावी गेल्यानंतर निदान एक दिवस तरी मी दादाची भेट घेऊन येतोच.माझं आणि त्याच गावं एकच. तो मात्र तिथेच स्थायिक झालाय.स्वतःचा व्यवसाय थाटलाय त्याने.ते ऐकून देखील फार बर वाटलं.(माझ्यात देखील स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा अशी सुप्त इच्छा आहे.नोकरी करणं मला फारसं पसंत नाहीये.)मी त्याला भेटायला गेल्यावर आम्हा दोघांची कामावर चर्चा होते .मग दादा स्वतःची फोटोग्राफी ची कामे दाखवून तसेच त्याच्या डोक्यातील कामविषयीच्या निरनिराळ्या कल्पना मला बोलून दाखवतो.त्यावर माझं मत घेतो.मी हि माझी कामं त्याला दाखवतो.मग त्यावर चर्चा होते.
मनात मात्र फार समाधान असतं.कारण आपल्या गावात,शेजारी समविचारी असण,आयुष्याकडे एका वेगळ्या नजरेनं बघणारा कुणीतरी असणं,त्याच्याशी व्यक्त होता येणं ह्यातला आनंद निराळाच. छायाचित्रकार म्हणून असा कलाकारी मनाचा दोस्त लाभलाय ह्याच समाधान काही औरच.
सध्या त्याचं फोटोग्राफी मध्ये खूप छान काम चालू आहे.आणि उत्तरोत्तर ते बहरतच जावो.खूप वेगळ्या कन्सेप्ट,कम्पोझिशन त्याच्या छायाचित्रांतून पाहावयास मिळतात.आंतराष्ट्रीय पातळीवर त्याच्या कामाची घेतलेली दखल.आंतराष्ट्रीय प्रदर्शनात त्याच्या कामाची झालेली निवड,तसेच विविध साप्ताहिक,वर्तमानपत्रात छापून आलेल्या मुलाखती ह्या सर्वांवरून त्याच्या कामाच्या क्षमतेचा आपल्यास आढावा येतोच.मलाही त्याच्याकडून खूप सारे शिकता येतेय.प्रेरणा घेता येतेय.हे सगळं पाहिल्यानंतर माझ्यात एक प्रकारची स्फूर्ती दाटून येते.काहीतरी करण्याचं बळ संचारतं.अश्या माणसाच्या संपर्कात असल्याचं एक वेगळं समाधान उराशी तर आहेच.कारण कणकवली सारख्या छोट्याश्या गावात राहून त्याने हे सर्व हासिल केलंय.अश्या छोट्याश्या गावातून मोठी भरारी घ्यायची स्वप्न उराशी बाळगलेल्या माझ्यासाठी दादा म्हणजे एक प्रेरणा आहे.सोप नसतं हो ते एक जबर इच्छाशक्ती असावी लागते.मळलेल्या वाटा सोडून चालायची धमक उराशी असावी लागते,सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास.
काही दिवसांपूर्वी मला कळलं कि दादा मुंबईत काही ठिकाणी त्याच्या 'फोटोग्राफी' कामाचं सादरीकरण करणार आहे .मला हि गोष्ट फारच भारावून गेली.मग मनात ठरवलंच,आता हि संधी सोडायची नाही.तेव्हा मी त्याच्या ठाण्यात असलेल्या कार्यक्रमाला आवर्जून गेलो..हॉल मध्ये प्रवेश करताच दादा पाठमोरा गप्पा मारत बसलेला दिसला..मागे उभा राहून दादाला हाक मारली..दादा...त्याने मागे वळून बघितलं.स्मित हास्य करत हात मिळवत मला म्हणाला अरे ते बघ तिकडे आपण लहानपणी जे एकत्र खेळत असू ना तेव्हा त्यामध्ये माझे दोन मित्र पण असत ते देखील आज आलेत ह्या कार्यक्रमासाठी..मग त्यातल्या एकाला दादाने पुढे बोलावून विचारलं ह्याला ओळखलस का? तो म्हणाला नाही रे...काय तू पण..तुला हा नाही आठवत ?अरे तेव्हा तो दुसरी तिसरीत असेल आपण सर्व मोठे होतो वयाने इत्यादी गोष्टी त्याने त्याला मी आठवावो ह्याकरिता सांगण्याचा प्रयत्न केला.त्यातल्या ते दुसरी,तिसरीत असेल हे वाक्य ऐकून त्याच्या समोर बसलेल्या वैभव छाया ला देखील हसू आवरलं नाही.तो म्हणाला अरे तुला एवढ्या वर्षापुर्वीच देखील आठवतंय?
आयोजकांनी त्याची औपचारिक ओळख वगैरे करून दिल्यावर थोड्यावेळाने दादा ने त्याचे सादरीकरण सुरु केलं.मी मागे खुर्चीवर बसून सर्व एकाग्रचित्ताने ऐकत,पाहत होतो.माझ्या मनात एक प्रकारचा अभिमान,समाधान दाटून आलं होतं.आपल्या गावचा,शेजारचा,माझ्या सोबत खेळलेला दादा आज सर्वांसमोर त्याच्या कामचं सादरीकरण करत होता. त्यानंतर दादाने एकामागोमाग एक त्याची कामं सादर केली..त्यातले काही विषय तर मनाला चटका लावणारे होते.मी भावनिक झालो होतो.एक तर आपला माणूस हि भावना दाटून आली होती माझ्या मनात आणि त्यासोबत मनाला चटका लावणारी छायाचित्रं आणि त्यामागची दादाची कहाणी ...त्यात आणखीन भर म्हणजे त्याला पूरक असे पार्श्वसंगीत.अश्या संमिश्र भावनांचा मारा माझ्यावर झाला....नकळत एक आसवाचा थेंब गालावर तरळून गेला.

कार्यक्रम आटोपल्यावर दादा आणि त्याच्या लहानपणी च्या मित्रांसोबत त्या रात्री एकत्र मिळून एका हॉटेलात जेवणाचा यथेच्छ आनंद घेऊन मी घरी परतलो. मनात एक नवी उम्मेद,प्रेरणा घेत स्वतःला सजग करत.
ये हौंसला कैसे झुके,
ये आरज़ू कैसे रुके
मंजिल मुश्किल तो क्या
धुंधला साहिल तो क्या
तनहा ये दिल तो क्या
ये आरज़ू कैसे रुके
मंजिल मुश्किल तो क्या
धुंधला साहिल तो क्या
तनहा ये दिल तो क्या
राह पे कांटे बिखरे अगर
उसपे तो फिर भी चलना ही है
शाम छुपाले सूरज मगर
रात को एक दिन ढलना ही है
रुत ये टल जाएगी
हिम्मत रंग लाएगी
सुबह फिर आएगी
उसपे तो फिर भी चलना ही है
शाम छुपाले सूरज मगर
रात को एक दिन ढलना ही है
रुत ये टल जाएगी
हिम्मत रंग लाएगी
सुबह फिर आएगी
सुमन दाभोलकर.
पूर्वी मी ज्यावेळेस घरी (म्हणजे माझ्या गावी) चित्रं काढायचो त्यावेळेस ते काढताना विशेषतः वडिलांची फार टिप्पणी असतं चित्रांवरती.एकदा, मी कदाचित फाईन आर्ट च्या पहिल्या वर्षाला असेन तेव्हा, मी एक पोर्ट्रेट करत होतो.ते ही स्केल मारून.वडिलांनी ते पाहिलं.मला म्हणाले अरे हे काय करतोयस?मी म्हणालो.. पोर्ट्रेट करतोय..अरे ते समजलं पण हे स्केल का मारले आहेस समोरच्या फोटोवर? मी म्हणालो...पप्पा तीच पद्धत आहे.त्यावर वडील म्हणाले अरे मग त्यात तुझे कौशल्य ते काय? हे स्केल मारून तर मी हि चित्र काढेन....तुझा हात एवढा परिपूर्ण व्हायला हवा कि तुला अशी स्केल मारायची आवश्यकता भासता कामा नये.त्यासाठी मेहनत करावी लागेल तुला..आणि तू ती मेहनत घ्यावीस अशी माझी मनापासून इच्छा आहे...वडील धाड...धाड.. धाड..लेक्चर देऊन निघून गेले....मी मनात म्हणत होतो..झालं..काही करायला गेलं कि ह्यांनी चुका काढायला सुरवातच केली म्हणा..परंतु काही कालावधी गेल्यावर असे वाटू लागलं कि..अरे पप्पा जे म्हणताहेत त्यात गैर काय? का करतोय मी स्केल मारून? कारण मला तसे रेखाटन करणं जमत नाहीये म्हणूनच ना ...त्या घटनेनंतर मी कधीच स्केल मारून चित्रं केली नाहीत..तसे विचार जरी मनात आले कि वडिलांचे लेक्चर आठवतं.वडिलांना चित्रांतलं फार काही कळायचं अशातला काही भाग नव्हता.परंतु त्यांनी माझी खोटी स्तुती कधीच केली नाहि.चित्र पाहून त्यांना जे वाटायचं, त्यावर ते तात्काळ टिप्पणी करून मोकळे व्हायचे. (तसे मलाही कुणी जास्त स्तुती केलेली नाही आवडत.फार फार तर स्तुती ऐकून मी एक स्मितहास्य करून मोकळा होतो.कारण स्वतःची पात्रता स्वतःलाच माहित असते.)परंतु वडिलांच्या योग्य टिप्पण्या ह्या माझ्या कामात सुधारणा होण्यास नेहमीच कारणीभूत ठरल्या आहेत.
हे सगळं आता आठवण्या मागचं कारण म्हणजे मी हल्लीच माझ्या घरी(गावी )गेलो होतो..
तिथे मी हे चित्र,माझ्या घरी अंगणात बसून केलंय.चित्रात शेजारचं एक घर आहे.
हे चित्रं पूर्ण झाल्यावर घरी आई वडिलांनी ते पाहिलं.वडिलांनी नेहमी प्रमाणे चुका काढल्या.म्हणाले अरे ते घर असे नाहीये.त्या चित्रात तू खिडक्या कमी दाखवल्यास मूळ घराला जास्त आहेत.शिवाय उंची थोडी कमी वाटतेय घराची तुझ्या चित्रात.काही झाडं कमी काढलीयस..अमुक तमुक.
वडिलांचं हे बोलणं ऐकून मी त्यांना म्हणालो,अहो पप्पा..ते सर्व बदल मी मुद्दामहूनच केलेत.मला जे वाटलं ते मी केलयं. चित्र काढताना नेहमीच समोरच दृश्य हुबेहूब काढावं असा चित्रकाराचा अट्टाहास नसतो किंबहुना तो नसावा.नाहीतर कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोत आणि चित्रात फरक तो काय? समोरच चित्र आहे तसे टिपण्याचं काम तर कॅमेरा देखील करतो...मी चित्रकार म्हणून समोरच्या दृश्याचा माझ्यावर पडलेला प्रभाव,मला त्यावेळेस जे भावलं,वाटलं ते मी त्यात उतरवण्याचा प्रयत्न केलाय..इत्यादी कॅसेट मी त्यांच्यासमोर लावली.वडील शांतपणे ऐकून घेत होते..मला म्हणाले अरे बापरे एवढं सगळं असत का त्यात आता ते मला कसं कळणार?मी आजपर्यंत समजतोय जे जस दिसतंय ते तसंच हुबेहूब काढणं म्हणजे चित्रकारिता..त्यावर मी म्हणालो हो पप्पा आजवर आपल्याकडे चित्रं म्हणजे हीच व्याख्या गृहीत धरली जाते...मग आम्हा दोघांचं फार बोलणं झालं ह्यावर..ते सगळं झाल्यावर वडील म्हणाले..बरं बरं कॅसेट बंद कर तुझी ..स्वतःला मोठा चित्रकार नको समजू...चल आता दुसरं चित्रं करायला घे.आणि हो ..आता तू एवढी मोठी कॅसेट लावल्यावर तुझा असा समज झाला असेल कि मी इथून पुढे तुझ्या चित्रांवर टिप्पणी करणार नाही..तर तो तुझा गोड गैरसमज आहे...मी चुका काढतच राहणार.असे म्हणून ते निघून गेले..मी मात्र हसतच राहिलो...

असा योग्य चूका काढणारा हक्काचा माणूस नेहमी सोबत असावा.
सुमन दाभोलकर.
वाढदिवसाची अनपेक्षित भेट
आज सकाळी माझ्या क्लास मध्ये अचानक एक गृहस्थ मला भेटायला आले.म्हणाले मला मनीषा चौधरी मॅडम नि येथे पाठवलंय.(हे गृहस्थ म्हणजे मनीषा मॅडम यांचा ड्राइवर,आणि ह्या मॅडम म्हणजे माझ्याच स्टुडंट)..मी म्हणालो बरं... त्यावर ते म्हणाले मला मॅडम नि तुम्हाला हे देण्यास सांगितलंय..ती बॅग हातात देऊन तो गृहस्थ निघुन गेला.मी विचारात पडलो... म्हटलं हे असं अचानक... आहे तरी काय ?बरं मॅडम नि फोन करून देखील कळवलं नव्हतं कि अमुक माणसा करावी मी काहीतरी पाठवणार आहे वगैरे.ती बॅग बाजूला ठेवून मी माझ्या कामात व्यस्त झालो..म्हटलं नंतर पाहू घरी जाऊन..त्या नुसार मी घरी आल्यानंतर ती बॅग खोलून पहिली.त्यात निरनिराळ्या प्रकारचे गिफ्ट्स होते.पेंसिल्स,कलर्स,ब्रशेस,चित्रकलेवर आधारित पुस्तकं, चॉकलेट्स,असं बरंच काही होत त्यात..आणखी विशेष म्हणजे त्या मॅडम नि माझे साकारलेलं रेखाटन...हे सारं पाहून मला अनपेक्षित असा धक्काच बसला...क्षणभर मी अवाकच झालो..पहातच बसलो.
त्या धक्क्यातून सावरत सावरत मॅडम ना मी फोन केला..
मी ........हॅलो
समोरून..... हा सर....बोला.
मी ..... अहो मॅडम हे काय?किती गिफ्ट्स?....
समोरून... ते सगळं जाऊदे हो... आधी रेखाटन कसं झालयं तुमचं ते सांगा..मी पहिल्यांदाच पोर्ट्रेट स्केच करण्याचा प्रयत्न केलाय ..पेन्सिल पोर्ट्रेट...
मी...... मॅडम खूप मस्त झालयं ते.माझे यापूर्वी असे रेखाटन कुणीच केले नव्हतं.मी फार जणांची केलीत म्हणा....खूप छान वाटलं मला...तुम्हाला माझा फोटो कुठून मिळाला?
समोरून.......सर तुमचा व्हाट्सअँप वर फार दिवसांपूर्वी एक डी.पि.होता हा फोटो...तो बघून केलंय मी हे...
मी....पण मॅडम त्या फोटोचा अँगल थोडा वेगळा होता..साईड अँगल होता तो...
समोरून.......हो सर..मी तो फोटो बघूनच स्केच केलयं.. परंतु अँगल स्वतः कल्पना करून बदलला..तुम्ही शिकवलेलं थोडं तरी दिसतयं का त्यात?
मी....काय सांगताय मॅडम..मस्तच छान जमवलंय तुम्ही.....
परंतू मी एवढ्या गिफ्ट्स देण्या योग्यतेचा आहे का मॅडम?मला फार अवघडल्या सारख वाटतंय..

समोरून ...हो सर तुम्ही आहातच त्या योग्यतेचे.बरं ठेवते फोन..
मनीषा मॅडम ह्या माझ्या स्टूडेंटस् पैकी एक..इतरही स्टुडंट्स असेच आहेत..हटके..माझ्या पेक्षा वयाने फार मोठे..तितकेच मनाने देखील..त्यांच्याकडून सर म्हणवून घेणे..हे देखील मला नेहमीच संकोचल्यासारखे वाटते..
मनात एक समाधान नेहमीच असतं..चांगली माणसं जोडल्याचं.....हीच माझी श्रीमंती!
सुमन दाभोलकर.
आज फोर्ट ला काही कामानिमित्त जाणं झाले.काम उरकल्यावर मॅक्स मूलर भवन,जेहांगीर दालनात प्रदर्शन पहावयास गेलो.
मॅक्स मूलर भवनात एक अनोखे इन्स्टॉलेशन सादर केलेय.भारतीय फिलॉसॉपी वर आधारलेले.फार छान.त्या ठिकाणी लिहिलेले एक कडवं तर अप्रतिम होते.
"What can be acquired through speech is vidya,what can be accomplished without using speech or even by speechless one is Kala."

तिथून मग जहांगीर दालनात गेलो होतो.चित्रकार 'प्रशांत प्रभू' ह्यांचे चित्र प्रदर्शन पाहिले.जलरंगातील फार सुरेख चित्रं केली होती.जलरंगातील चित्रं परंतु एक वेगळा नजरिया होता त्यांच्या चित्रात.रचना,रंगसंगती सारेच वेगळं, विलोभनीय.चाकोरीबद्धते बाहेर चे रंगलेपन दिसून आलं.
प्रस्तुत चित्रांमध्ये केवळ यथार्थवादी रेखाटनावर भर न दिसता उत्कृष्ट रचनाबद्ध चित्रं होती.
प्रशांत सरांशी थोड्याश्या गप्पा मारून मी त्या दालनातून निघालो.परंतु मनात प्रश्नानचा भडीमार सुरु झाला.मी स्वतः काय करतोय अथवा काय करावे ह्या विषयी चे प्रश्न मनोमन आदळत होते.
वेगवेगळ्या व्यक्ती, ठिकाणांना भेटी देण्याने हा फायदा होतो कि स्वतःचे मन चतुरस्र विचार करू लागते.चौफेर दवडू लागते.मग चालू होते ते मनन, चिंतन...
प्रवाहा विरुद्ध पोहण्यात एक वेगळीचं मजा असते.आणि ते करण्यासाठी एक जिगर देखील लागते.स्वतःचा जगण्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असावा लागतो .जीवनात स्वतःला आलेला अनुभव चित्रातून प्रतीत होणे म्हणजे कलाकारी.नाहीतर उरते ती नुसती कारागिरी.असे माझे मत आहे.

माझ्या लहान मुलाने काल 'बुद्धिबळ' स्पर्धेच्या दोन फेऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या,परंतु तिसऱ्या फेरीत हरला तो.फार छान खेळाला.खेळता खेळता प्रतिस्पर्ध्याला तो नकळत मदत देखील करत होता.त्याला घड्याळाचे ठोके पाडायची आठवण करून देत होता.(मी मनात..वाह! निरागसता!) आम्ही त्याला बुद्धिबळाच्या क्लास ला अजुनतागायत घातला नाहीये.तरीसुद्धा तो एवढा छान खेळलाय,त्याचे आम्हाला देखील आश्चर्य वाटतंय.आता मात्र आम्ही त्याला शिकवणी लावू बुद्धिबळ ची. माझी विद्यार्थिनी असलेली एका मुलाची आई आपल्या लहान मुलाबद्दल मला सांगत होती. हे सारे ऐकून माझ्या मनात माझ्या बालपणीच्या आठवणी तरळू लागल्या. मी शाळेत असताना मला शालेय अभ्यासाव्यतिरिक्त क्रिकेट,कॅरम,बुद्धिबळ,चित्रकला ह्या गोष्टींच ठार वेड.साधारणतः मी तिसरीत असल्या पासून बुद्धिबळ खेळायचो.
आम्ही पूर्वी भाडयाच्या घरात राहत असू.त्या घराचे घरमालक म्हणजेच माझ्या शाळेचे मुख्याध्यापक.आमच्या शेजारीच राहत.ते स्वतः त्यांची मूलं हे सर्व बुद्धिबळ खेळण्यात माहीर.तसेच माझ्या पेक्षा वयाने देखील मोठे.त्यांचा नेहमी संध्याकाळी घरात बुद्धिबळ खेळण्याचा सराव चालू असे.मी ते फार एकाग्रचित्तानं पाही. त्यांचे डाव फार मन लावून पाहत राही.केव्हा केव्हा गुरुजी,त्यांची मुलं माझ्या सोबत खेळत असत.एकदा मी गुरुजींना हरवलं.आणि माझं आनंद गगनात मावेनासा झाला. घरी जाऊन आई वडिलांना म्हणालो .. मी आज गुरुजींना हरवलं.तर आई वडील एकमेकांकडे बघून म्हणाले …. त्यांनी हरून घेतलं असेल.ते कसे काय हरू शकतात तुझ्या बरोबर ?तेव्हा मी तिसरीत असेन.गुरुजी त्यावेळचे पट्टीचे खेळाडू होते आणि ह्याची जाणीव माझ्या आई वडिलांना नक्कीच होती.पण माझा काही केल्या मला बहाल केलेल्या विजयावर विश्वास बसतच नव्हता.मी हरवलय त्यांना.असं मी ओरडून ओरडून सांगत होतो.आपल्याकडे मोठ्या वयाला नेहमीच प्राधान्य दिले जाते.(कदाचित त्या कारणामुळे माझ्या त्या खेळाचे कुणास काहीच वाटले नसावे.परंतु आजतागायत मला ती बाब स्मरणात आहे.खरंच गुरुजींनी हरून घेतले होते कि मी त्यांना हरवलं होत हे मात्र मला कळलेलं नाहीये.)
त्यावेळी कुठेही बुद्धिबळ स्पर्धा असो मी अगदी हिरिरीने स्पर्धेत भाग घेत असे.कुठलीहि स्पर्धा सोडत नसे.आई वडीलांकडून अभ्यासाच्या नावाने नेहमी ओरडा खावा लागे मला.परंतु बाकी ठिकाणी मी आघाडीवर.आई वडील मात्र म्हणत .. हा मुलगा शालेय अभ्यासात रस दाखवत नाहीये मात्र खेळात ह्याला कमाली चा रस.बरं घरात बुद्धिबळ खेळणार कुणीही नाही.माझे निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेणं चालूच असे.एकदा असाच एक स्पर्धा जिंकून घरी आलो.पाचवीत असेन कदाचित तेव्हा.फार उत्साहात आईला म्हणालो आई...जिंकलो मी स्पर्धा.. (पूर्वी आम्ही एकटे सर्व ठिकाणी फिरायचो.सोबत पालक नसायचेच कुठे.फाजील लाड कधी झालेच नाहीत.आजकाल च्या मुलांसारखं आमचं नशीब नव्हतं.आजकाल मुलांना बाथरूम ला जाताना देखील पालक सोबत लागतात.शाळेत ने आण करायला पालक.दप्तराची ओझी उचलायला पालक.असो.)आईला खरंच वाटेना म्हणाली उगीच काहीतरी नको सांगुस.मी ओरडून सांगतोय आई मी जिंकलो ग... खरंच…..तेव्हा काही कालावधीने आईच्या डोळ्यात पाणी आले.म्हणाली शाब्बास! फार धडपड्या आहेस तू.कुठे ना कुठे तुझे काहीतरी चालूच असते.कुठून शिकलास रे हे ?तुझ्या ना वडिलांना बुद्धिबळ येत ना मला ना तुझ्या भावंडाना.(त्या वेळी कुणा कडे शिकवणी वगैरे तर दूरच.बरं घरात बुद्धिबळ खेळणार कुणीही नाही.कालांतराने छोटा भाऊ शिकला होता.)त्यावेळेस माझी जिल्हास्तरीय विभागात निवड झाली होती.आणि राज्यस्तरावर खेळण्यासाठी आम्ही रवाना झालो होतो. तिथे एक एक वाकबगार खेळाडू.बुद्धिबळ घड्याळ लावून खेळतात (हे मी ऐकले होते परंतु कधी पाहिलंही नव्हतं तर खेळायचे तर दूरच.) परंतु तिथे ते घड्याळ वापरून स्पर्ध्येच्या नियमाप्रमाणे खेळावं लागलं.सगळंच नवीन. परंतु जिद्द मात्र जुनी होती.खेळात येईल ते आव्हान पेलायची मनाची ताकद केली होती.कुठून आली होती ताकद ते माहित नाही.परंतु झगडत होतो.दोन फेऱ्या यशस्वी रित्या पार पाडल्या.बरं एकदा जिंकलो कि प्रोत्साहन द्यायला शेजारी आई वडील नव्हते.(मी लहान होतो हो.)आम्हाला स्पर्धेला घेऊन गेलेले शिक्षक असायचे.परंतु शिक्षक शेवटी शिक्षकच.झाले तिसऱ्या फेरीत हरलो .मात्र शिक्षकांनी फार कौतुक केले माझे.म्हणाले छान खेळलास.ह्या खेळांमुळे,चित्रकलेमुळे तरी निदान शाळेतले शिक्षक मला ओळखत असत.नाहीतर नेहमी अभ्यासू हुशार मुलंच शिक्षकांना फार प्यारी असतात.आमच्या सारख्या नाना कळा अंगी असणाऱ्यांना कोण विचारेल म्हणा.असो.
अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे माझं चालूच असे.अगदी दहावी पर्यंत बुद्धिबळ सतत खेळलो नंतर मात्र जो बंद केला तो बंदच.अधून मधून खेळतो म्हणा मी.शाळेत असताना अभ्यासाची शिकवणी सोडून मी लेदर बॉल क्रिकेटच्या सरावाला नियमित जायचो.मनात मोठी उमेद सचिन तेंडुलकर बनण्याची.मैदानावर जिवाच्या आकांताने सर्व करायचो.एक आशा डोळ्यासमोर ठेवून.परंतु योग्य मार्ग दाखवणारं कुणी नव्हतं.सचिन बनायचे,विश्वनाथ आनंद बनायचे सपने सपनेच राहून गेले.सर्वत्र नेहमी शेजारच्या अभ्यासात हुशार असलेल्या मुलांचे दाखले दिले जात.कर कर अभ्यास कर मोठा हो...... डॉक्टर हो ... इंजिनिअर हो.... त्या निरागस बालमनाला नेहमी प्रश्न पडत..अरे मी चांगला क्रिकेट खेळतो,बुद्धिबळ खेळतो कुणाला काहीच नव्हते त्याचे.अभ्यासात हुशार असलेल्या मुलाने माझ्यासोबत बुद्धिबळ खेळून दाखवावा? हे मनोमन म्हणत असे.परंतु आपोआप सगळं विरून गेलं.केव्हा केव्हा वाटते माझे बालपण खेडेवजा शहरात गेल्यामुळे बराचश्या अंगभूत कलांना योग्य न्याय नाही मिळाला.कुठेतरी त्यांच्यावर अन्याय झाला.खेडेगावांत अशा कित्येक कत्तली मनातल्या मनात होत असाव्यात.नकळत अंगातले कौशल्य,नैपुण्य मारले जाते.
परंतु माझ्या आई वडिलांचे आभार त्यांनी माझ्या एकातरी कौशल्याला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न केलेत.आणि आज मी चित्रकलेच्या क्षेत्रात,माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करतोय.मनाजोगं काम करून पैसे मिळवतोय.बाकि प्रयत्न चालूच आहेत,राहतील... मंजिल अभी दूर है!

नुकताच एका ‘पेंटिंग वर्कशॉप’ ला जाऊन आलो.’अखंड लोकमंच’ ह्या संस्थे तर्फे हि कार्यशाळा आयोजिली होती. ह्या संस्थे चे अध्यक्ष श्री. नामानंद मोडक यांच्या विषयी माझ्या बाळबोध मनाने जाणून घेण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न मी माझ्या शब्दांतून मांडतोय.
‘नामानंद मोडक’ सर आणि माझी चांगली मैत्री..तसे पहावया गेल्यास मोडक सर माझ्यापेक्षा वयाने,कर्तृत्वाने फार मोठी हस्ती.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रकार.परंतु कलाकार म्हणून आम्ही दोस्त.जेव्हा केव्व्हा मी माझ्या गावी जातो म्हणजे कणकवलीला, तेव्हा सरांच्या स्टुडिओला आवर्जून भेट देतो. तासनतास आमच्या नाना विषयांवरील गप्पा चालू असतात. त्यात चित्रकलेच्या क्षेत्रात काय चाललेय ? चित्रकारानविषयी/कामाविषयी,कलेविषयी इत्यादी गप्पा देखील असतात.गप्पांच्या ओघात दोन तीन तास केव्हा आणि कसे सरतात हे कळतही नाही.पुरोगामी विचार असलेल्या सरांचे वाचन अफाट! त्यात बुद्ध तत्वज्ञान हा सरांचा आवडता विषय.सरांना विविध विषयांवर बोलायला फार आवडतं आणि मी ताकदीचा 'कानसेन'.असे परस्पर पूरक आम्ही. मला नेहमीच विविध विषयांवर ऐकायला आवडतं .बऱ्याचदा आपल्या मनात नाना प्रकारचे विचार सतत घोळत असतात,सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल स्वतःची मतं असतात,एक भावना असते,दृष्टिकोन असतो, भोवताली जे घडतंय त्याबद्दल मनात खदखद चालू असते.परंतु ह्या साऱ्याला वाट मोकळी करुन देता येईल असा कुणीतरी सभोवताली असणं हे फार गरजेचं असतं.समविचारी मनुष्य सापडणं, तो असणं हे फार समाधानकारक असतं.आणि माझ्या सभोवताली असलेल्या परंतु संख्येने कमी असलेल्या समविचारी माणसांमध्ये मोडक सर नेहमीच असतील.
मोडक सर म्हणजे समाजप्रेमी व्यक्ती.समाजातल्या दुर्लक्षिलेल्या घटकांकरिता झगडणारं व्यक्तिमत्व.सर 'कातकरी' समाजाच्या हक्कांसाठी गेली कित्येक वर्ष लढा देत आहेत.समाजहितपयोगी कार्यांमधला त्यांचा सहभाग हा उल्लेखनीय असाच असतो.एक चित्रकार म्हणूनही ते समाजाप्रती चित्रांतून देखील व्यक्त होत असतात.गेल्या वर्षी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ त्यांनी केलेल्या एका इन्स्टॉलेशन मधून तो प्रत्यय आपल्यास आलाच होता.
सरांच्या डोक्यात कलाक्षेत्राबद्दल निरनिराळ्या प्रयोगांच्या संकल्पना घोळत असतात.त्यांनी तसे मला बऱ्याचदा बोलून देखील दाखवलं होतं.त्यातलीच एक संकल्पना म्हणजे चित्रकार /शिल्पकार संमेलन. आपल्याकडे साहित्य,कवी इत्यादी प्रकारची संमेलनं होत असतात परंतु चित्रकार,शिल्पकार यांची संमेलनं होत नाहीत.असं सरांचं सतत च म्हणणं.ते ऐकून मी तर एकदा अवाकच झालो. मनोमन म्हटलं किती समृद्ध,वैश्विक विचार करतो हा मनुष्य. स्वतःसाठी जगणारे तर लाखो असतात परंतु अवघ्या कलेविषयी अशी आस्था असणारा, ती अंगी बाळगून असणारा मनुष्य मी त्यांच्यात पाहत होतो.हेच त्यांचे वेगळेपण.कणकवली सारख्या खेडेवजा शहरात राहणारा हा गृहस्थ एखाद्या गोष्टीनं झपाटल्यागत काम करतोय,त्या साठी कोकणातून मुंबईस सतत हेलपाटे मारतोय,चित्रकार ,शिल्पकार इत्यादींच्या गाठीभेटी करतो.निव्वळ चित्रकलेवर स्वतःचा उदरनिर्वाह असणारा हा गृहस्थ वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून, पदर मोड करून झटतोय.हे सारे कशासाठी?तर त्याचे उत्तर आहे...कलेप्रती असलेली निष्ठा.हे पाहून मी पुरता भारावून गेलोय.सर मुंबईला आल्यावर आवर्जून मला फोन करतात,भेटतात. आमच्या त्या अनुषंगाने गप्पा होतात.मग सर पुढील कार्यप्रणालीचा ओघवता आलेख माझ्या समोर मांडतात,सरांना जमेल ते सहकार्य करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो.एके दिवशी संमेलना निमित्त मोडक सर तसेच काही चित्रकार,गझलकार भीमराव पांचाळ,इत्यादी सारे मिळून प्रभाकर कोलते सरांशी मिटिंग करण्याच्या हेतूने एकत्र जमण्याचा कार्यक्रम आखला गेला.त्यासाठी मोडक सरानी मला देखील फोन केला होता. सुमन तू ये मिटिंग ला...परंतु काही पूर्वनियोजित कामांमुळे मला जाता आले नाही.त्याचे शैल्य मनात होतेच.मात्र ह्या वर्षीच्या कार्यशाळेच्या पूर्वतयारी चा पाठपुरावा मी सतत सरांकरवी करत होतो.
संमेलनाच्या अनुषंगाने मार्गक्रमण म्हणून त्यांनी गेल्यावर्षी पासून पेंटिंग कार्यशाळा आयोजित करण्यास सुरवात केली.गेल्यावर्षीच्या कार्यशाळेत मार्गदर्शन म्हणून चित्रकार अनिल नाईक सर याना आमंत्रित केलं गेलं होतं.विना प्रवेश शुल्क असलेल्या त्या कार्यशाळेस महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रा बाहेरील विद्यार्थी यांचा उल्लेखनीय सहभाग लाभला होता.ह्या वर्षीच्या कार्यशाळेत चित्रकारांस मार्गदर्शन म्हणून चित्रकार 'प्रभाकर कोलते' यांस पाचारण केले गेले होते.ह्या वर्षी निदान काहीतरी शुल्क चित्रकारांकडून आकार...कार्यशाळा मोफत नको ठेवूस.असा सल्ला कोलते सरानी मोडक सरांस दिला होता.मोफत मिळाल्यास त्याची कदर होत नसते असा वडिलकीचा सल्ला होता तो.म्हणून ह्या वर्षी काही शुल्क आकारले गेले तेही नाममात्र असेच.
तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरालगत असलेल्या 'असरोंडी'ह्या गावात ह्या वर्षी ची कार्यशाळा संप्पन्न झाली.हि कार्यशाळा तीन दिवस होती.अगदी डोंगरावर,चारी दिशांना झाडेच झाडे ,मोबाईल ला नेटवर्क नाही अशी जागा ह्या कार्यशाळेसाठी निवडली गेली.सहभागी चित्रकारांनी ह्या संधीचा मनसोक्त आनंद लुटला.वेगवेगळ्या प्रकारची चित्रं पाहावयास मिळाली,त्यात कोलते सरांचे मार्गदर्शन.हि तर दुग्धशर्कराच.सोबत सुरेंद्र जगताप सर ,मुकुंद गावडे सर यांचे देखील मार्गदर्शन होतेच.तीन दिवस केव्हा उलटले हे कळलेच नाहीत.
कार्यशाळा दुर्गम अशा भागात असून देखील कोणत्याही गोष्टीची कमी जाणवली नाही.नियोजन,संयोजन अगदी वाखाणण्याजोगे. हे यश होतं मोडक सरांच्या ठायी असलेल्या दुर्दम्य इछाशक्तीचं.

आता वेध लागलेत ते होऊ घातलेल्या संमेलनाचे......... मोडक सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!
सुमन दाभोलकर
काल 'प्रवीण झाला' सरांना मी सहज फ़ोन केला.खुशालीसाठी.सर कसे आहात ?तब्येत कशी आहे?तसे मी आणि ते एकमेकांच्या संपर्कात नेहमी असतो हल्ली मात्र बरेच दिवस आम्हा दोघांचे बोलणे झाले नव्हते.ते माझे आर्टिस्ट मित्र.फोन वर बोलता बोलता दुसऱ्या दिवशी भेटण्याचा बेत ठरला.त्याप्रमाणे मी त्यांच्या घरी गेलो.गप्पा वगैरे चालू असताना प्रवीण सरानी त्यांची हल्ली केलेली चित्रे दाखवण्यास सुरुवात केली.त्यांच्या कामात लक्षणीय प्रगती झाल्याचे मला आढळले. त्या प्रमाणे मी त्यांना म्हणालो देखील सर…. लगे रहो.
'झाला 'सर ठाणे शहरातील एक यशस्वी उद्योजक.वयाशी पन्नाशी उलटलेला गृहस्थ.त्यांच्या वर 'यकृत प्रत्यार्पणाची शस्त्रक्रिया' देखील झालेली आहे.म्हणून स्वतःच्या प्रकृती खातर त्यांनी उद्योग धंद्या मधले लक्ष कमी करून चित्रकलेसारखा आवडता छंद जोपासण्याचे ठरविले.आणि त्यात बेभान विसरून,उस्फुर्त पणे ,सातत्याने त्यांचे हे काम चालूच आहे.चित्रकलेचे कोणत्याही प्रकारचे शिक्षण न घेतलेला हा मनुष्य.परंतु एखाद्या पदवीधारक चित्रकाराला लाजवेल अशाप्रकारचे त्यांच्या कामातील सातत्य,उत्साह हे नेहमीच वाखाणण्याजोगे असते.ते म्हणतात मी चित्र काढायला सुरुवात झाल्यापासून आता ३ वर्षे उलटलीत.परंतु आज माझ्याकडे सुमारे ३५० ते ४००चित्रं तयार आहेत.कसलं हे कमालीचं सातत्य.. त्यात तब्येत अधून मधून त्रास देत असते.परंतु हा जिगरबाज माणूस त्याची हि तमा न बाळगता आयुष्याचा अगदी मनसोक्त आनंद घेतोय. ह्याचे खुप कौतुक व नवल वाटतेय.कुठून येते हि ऊर्जा?त्यात हा कमालीचा मनमिळावू ,बोलक्या स्वभावाचा मनुष्य.तस मी त्यांच्या समोर फारच छोटा.परंतु तरीही ते मला योग्य तो आदर नेहमीच देत असतात.कधी कधी मला समाधान वाटते ते ह्या गोष्टीचे कि मी आज वरच्या माझ्या आयुष्यात काही चांगली माणसं जोडलीत त्यात’ झाला’ सर हि आहेत. त्यांना पाहताक्षणी मनातला क्षीण तात्काळ निघून जातो.आपण स्वतःही काहीतरी करावे हि उर्मी देखील दाटून येते.
आज काही वेळ त्यांच्या घरी गप्पा झाल्या नंतर आम्ही त्यांच्या स्टुडिओवर गेलो.स्टुडिओ चे दार उघडताच रंगांचा दर्प सर्वत्र पसरलेला.मग माझी नजर चौफेर फिरू लागली.स्टुडिओ च्या प्रत्येक कानाकोपऱ्यात.सरांचे नवीन एखादे कोणते चित्र आहे का हे पाह्ण्याची माझी धडपड.तेवढ्यात पाहतो तर काय झाला सर रंग,कागद घेऊन चित्र करण्यात गुंतूनही गेले.मला म्हणाले तुही काहीतरी करतोयस का?कोणते रंग काढू ?सांग ?मी थोड्या विचारानंतर म्हणालो सर आज 'पॅलेट नाईफ' च्या साहाय्याने एखादे चित्र करतो.मग ठरलं कि झाला सर मॉडेल म्हणून बसतील.झाले मी सरांचे चित्र रंगवून पूर्ण केले. सरांना ते फार आवडलं.म्हणाले हे माझ्याकडेच राहू दे.फार छान झालेय.तुझी आठवण म्हणून ठेवतोय हे पेंटिंग.चित्र काढता काढता काही तास कसे उलटून गेले हे काहीच कळलं नाही. शेवटी एक चित्र पूर्ण झाल्याचे,वेळ सत्कारणी लागल्याचे एक समाधान घेऊन व सरांचा निरोप घेऊन मी निघालो.सर निघता निघता कुठून रिक्षा मिळेल हे आवर्जून सांगून नंतर भेटू असे म्हणाले.आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
निघताना मात्र माझ्या डोक्यात एक विचारसत्र घोळत होते. कि आपण स्वतःच्या मनात स्वतःप्रति,स्वतःच्या परिस्थिती प्रति साठवून ठेवलेलं दुःख नेहमी गोंजारत असतो.त्याचा अप्रत्यक्षपणे बाऊ देखील करत असतो. परंतु काही माणसांना पाहून,भेटून डोंगराएवढ वाटत असलेलं हे दुःख क्षणार्धात इवलंसं ठरतं.आपल्या जीवनात सभोवताली असलेल्या नाना प्रकारच्या अवलिया,जिंदादिल,सदाबहार माणसांतून बरचं काही शिकण्यासारखं असतं.

आज माझे हे चित्र एका पहिलीतल्या मुलाने काढलेय.
अथर्व आज मला म्हणाला,आज मी तुमचे चित्र काढतो.तुम्ही माझ्या समोर बसा. मी म्हणालो काढ. त्या नंतर त्याने चित्र काढण्यास सुरुवात केली.प्रथम पेन्सिल ने रेखाटले त्यानंतर त्यात रंग भरले. मी हे सारे निमूटपणे पाहत होतो.रेखाटन झाल्यानंतर त्याने जलरंगात चित्र रंगवण्यास सुरुवात केली. मी म्हणालो अरे पेस्टल कलर घे वॉटर कलर नको ते आपण नंतर शिकू. तर म्हणाला पेस्टल नको बोटं दुखतात रंगवते वेळी. मी म्हणालो बरं. जशी तुझी मर्जी.पहिल्या प्रथम स्किन कलर दिला,त्यानंतर ओठ रंगवायला सुरुवात केली तर त्याने व्हायलेट ( जांभळा)कलर पॅलेट वर घेतला ,मी न राहवून विचारले अरे हा का रंग घेतलास ओठांना? तर म्हणतो ,तुमच्या ओठांमध्ये रेड कलर ,व्हायलेट कलर ह्यांचे मिश्रण दिसतय.मी काही क्षण अवाक झालो.एवढासा हा आणि ह्याला रंगा बद्दल कळतेय ते तरी कसे ?ते हि अशा छटा ? कि ज्या योग्य निरीक्षणांती च कळतात. पुढे मी काहीच बोललो नाही त्याने चित्र रंगवून पुर्ण केले.
मला लहान मुलांमध्ये नेहमीच एक गोष्ट भावते ती म्हणजे त्यांचे निरीक्षण.त्यांचे विविध पण अचूक प्रश्न ,त्यांची निरागसता सारेच अवर्णनीय.
मी कधी हि त्यांना चित्रकला शिकवायचा प्रयत्न करीत नाही किंवा तसा तो कुणी करू नये,असे माझे मत आहे.त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांचे विचार त्यांना काय आवडते ते सारे कागदावर मांडू द्यावे तीच तर खरी नवनिर्मिती,सृजनशीलता.
लहान मुलांना त्याच्या पद्धतीने चित्रे काढू द्यावीत फार फार तर त्यांना रंग ब्रश मध्ये कसा घ्यावा ?पाणी किती वापरावे ?ब्रश, पेन्सिल हाताळण्याच्या पद्धती?विविध रंगाबद्दल माहिती इत्यादी... इथवर माहिती देऊन थांबावे. बाकी त्या मुलाला स्वतःच ठरवु द्यावे. कोणता रंग कसा कागदावर चोपडायचा अथवा पेन्सिल ने रेघोट्या कशा मारायच्या हे.बुडु द्या त्याला आसमंतात.न्हाऊन निघू द्या त्याला.त्याच्या विश्वात. त्यातून त्याला जो आनंद मिळेल तो अवर्णनीय असेल.
बऱ्याचदा लहान मुलांना अमुक एखादे चित्र बघून काढायला दिले जाते व त्याने ते कॉपी करावे असा अट्टाहास असतो शिकवणाऱ्याचा व तो मुलगा तसे करू लागल्यास तो चांगले चित्र काढतोय असा एक ( गैर)समज तयार होतो.अशाने त्यांच्यातल्या नवनिर्मितीला ,सृजनशीलतेला वाव कसा मिळेल ?मुळात आपल्याला कलाकार हवेत कि कारागीर ?हे पक्के ठरवले पाहिजे. हि समज जशी ड्रॉईंग क्लास घेणाऱ्यांमध्ये हवी तसेच ती पालकांमध्ये देखील हवी. नाहीतर कुठेतरी मुलाला एक दोन तास गुंतवून ठेवावे म्हणून सर्रास मुलाला ड्रॉईंग क्लास ला पाठवणाऱ्या पालकी मानसिकते मध्ये नवनिर्मिती ,सृजनशीलता हे कशाशी खातात हे देखील माहित नसते. चित्रकला म्हणजे वेळ घालवण्याचे साधन इतर गोष्टीतून वेळ जर उरला तर ते मुलांना चित्र काढू देतात असे हे आजचे तथाकथिक (मॉडर्न) पालक.मुळात पालकांनाच जाणीव नाहीये.
एक माझ्या ओळखीच्या व्यक्ती आहेत त्यांची मुलगी परदेशात स्थित आहे.तिच्या मुलाचे उदाहरण देऊन त्या मला म्हणाल्या कि बाहेरच्या देशात जेवढे इतर विषयांना महत्व दिले जाते तितकेच चित्रकलेला देखील दिले जाते. माझ्या नातवाच्या शाळेत फार महत्व आहे चित्रकलेला.

ह्या निमित्ताने दोन दिग्गज चित्रकारांची १.पिकासो २.रवींद्रनाथ टागोर यांची काही वाक्ये आठवली ती अशी ....
१. प्रत्येक मूलं हे एक कलाकार असते,परंतु त्याचे वय वाढताना त्यातला कलाकार कसा जपावा?हि फार मोठी समस्या असते.
२. जर मी एखादा तरबेज कलाकार असतो,तर चित्र बनवताना बहुतेक पूर्व आधारित कल्पनेचे अनुसरण केले असते. पण हि गोष्ट खूपच प्रोत्साहक आहे कि मन आपल्या विचारशक्ती पलीकडच्या एखाद्या वस्तूने भारून जाते ते अमूर्त तत्व हळूहळू एक स्वाभाविक रूप धारण करू लागते.
सुमन दाभोलकर.
परवा नवी मुंबईतील एका कॉलेजात "फाईन आर्ट" वर लेक्चर दिले.ह्या क्षेत्राबद्दल ची जाणीव वाढावी ह्या हेतूने हे लेक्चर त्या कॉलेज च्या वतीने एफ.वाय.बी. कॉम ,एस.वाय.बी.कॉम ,टी.वाय.बी.कॉम इत्यादी वर्गांतील मुलांसाठी आयोजित करण्यात आले होते.
माझी ओळख वगैरे ह्या औपचारिक बाबी पार पडल्यानंतर मी बोलायला सुरुवात केली. पहिला प्रश्न मुलांना विचारला "फाईन आर्ट" म्हणजे माहितीये का ?ते ऐकून काही मुले टंगळ मंगळ करीत होती तर काही लक्षपूर्वक ऐकत होती. तेवढ्यात मधल्या एका बाकावरून आवाज आला ,सर जेजे ,पेंटर ,हुसैन हे शब्द कानावर पडले.(चित्रकला म्हटल्यावर जेजे, हुसैन हे शब्द प्रत्येकाच्या तोंडावर सर्रास येतात.) थोडं बर वाटलं, मनात म्हटले निदान काहीतरी माहितीये ह्यांना,तसे पाहावयास गेल्यास ह्या क्षेत्राबद्दल अनभिज्ञता जास्त . अरे वा तू चित्र काढतोस ! ..... फार छान ! ,तू आर्टिस्ट आहेस ? वा.....भारी ! इत्यादी ठराविक टिप्पणी व्यतिरिक्त ह्या क्षेत्राबद्दल फारसे काही ऐकावयास नाही मिळत,तसेच चित्र प्रदर्शन म्हणजे ते फक्त हाय कलास लोकांसाठीच ,आम्हाला कुठे परवडताहेत ती चित्र ?असे म्हणून त्या कडे पाठ फिरवायची अशा बाबी सर्रास पहावयास मिळतात.ह्या क्षेत्रातील अशा अनेक सर्व बाबींवर मुलांशी चर्चा केल्या.
त्या अनुशंघाने काही महिन्यांपूर्वी घडलेला किस्सा आठवला तो असा ...
मी घरी पेंटिंग करत बसलो असता शेजारच्या मुलाने ते पाहिले व दाराच्या फटीतून डोकावत मला विचारले दादा आत येऊ का ? मी म्हणालो अरे ये ना.. दादा ..... फार छान छान चित्र काढतोस रे तू.. मी अधून मधून डोकावत असतो तुझ्या घरात ,तू चित्र काढताना .. पण तुझ्या कामात व्यत्यय येईल म्हणून मी काही न बोलताच निघून जातो ....मी म्हटले तुला आवडत का रे चित्र काढायला ?त्यावर तो बोलता झाला . दादा मला भयंकर आवड आहे रे चित्र काढायची.. पण घरी आई वडील चित्र काढू देत नाहीत. म्हणतात अभ्यास कर .. चित्र काढून पोट भरणारेय का ? मी नववीत आहे दादा. १०वी चा अभ्यास आहे पुढे .... असे बरेच ऐकायला मिळते आई बाबांकडून .. त्यामुळे त्या भीतीने मी चित्र काढणं बंद केलय.तुला पेंटिंग करताना बघतो तेव्हा फार इच्छा होते चित्र काढायची.. मी सगळं शांत चित्ताने ऐकत होतो.वाईट देखील वाटत होते त्या मुलाचे आणि समाजात कलेविषयी असलेल्या समजुतीचे .(हातातले काम थांबवून मनातल्या मनात माझ्या आई वडिलांचे आभार मानत होतो.निदान मला ज्यात रस आहे ते तरी पालकांनी करू दिले).दादा एक चित्र काढायला किती वेळ लागतो रे ? तुला तर मी तासनतास एक जागेवर बसलेला पाहतो चित्र काढताना. एवढा वेळ कसा बसू शकतोस तू ? कंटाळा नाही येत तुला ? कुठे नेवून विकतोस ही चित्रं ? कितीला विकतोस ?अशा नानाविविध प्रश्नांची सरबत्ती त्याने लावली. मला आश्चर्य वाटले की हा आहे एवढासा पण ह्याच्या मनात चित्रांवर आधारित प्रश्न किती ? मी त्याच्या एवढ्या वयात असताना असले विचार कधीच केले नसावेत . फार फार तर कागदावर काहीतरी रंगवायचे आणि कुणी कौतुक केले की क्षणिक समाधानी व्हायचे ह्या पलीकडे मनात कोणतेही विचार शिवत नसत. पण ह्यावरून एक गोष्ट आढळली ती म्हणजे पैसा किती महत्वाचा आहे हे त्या मुलाच्या तोंडून ही नकळत आले. आता हे चांगले म्हणावे की वाईट ? ह्या वयात त्याच्या मनात हे विचार घोळताहेत ह्याचा अर्थ आजूबाजूस असणारे वातावरण सदैव डोक्यावर आदळणारे शब्द , कोणतेही गोष्ट करण्यापूर्वी पैसे किती मिळतील हा प्रश्न. बाकी त्या गोष्टीतून पैशाव्यतिरिक्त मिळणार असलेल्या बाबींची पायमल्ली सतत होत असते . ह्या वातावरणात कलेतून मिळणारा आनंद , समाधान ह्या गोष्टींचे महत्व कुणास किती कळेल ,उमजेल? ही शक्यता धूसरच . तसे भारतात पहावयास गेल्यास आर्थिक बाबतीत कनिष्ठ ,मध्यम वर्गाचे प्रमाण जास्त. त्यात आवड ,निवड ह्या गोष्टींना प्राधान्य सहसा नसते. त्यात चित्रं ही मूलभूत गरज नाहीये. ..साधारणपणे वर संबोधलेल्या वर्गांमध्ये असे माझे मत आहे.

जो पर्यंत प्रत्येक गोष्ट पैशात मोजण्याची मानसिकता बदलत नाही,जीवनाचा निखळ आनंद कशात आहे हे उमजत नाही तोवर काही खरे नाही. "पैसा हे साधन आहे साध्य नाही."
सुमन दाभोलकर.
बऱ्याच वर्षांनी म्हणजे तब्बल सात वर्षांनी उत्तम ची व माझी भेट झाली. ती गेल्यावर्षी , साधारणतः ह्याच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात. 'उत्तम साठे 'म्हणजे एक हरहुन्नरी कलाकार ..चित्र असो अथवा शिल्प हा सगळ्यात तरबेज. कलेचा वेगवेगळ्या अंगाने,ढंगाने अभ्यास करणारा सच्चा कलावंत .."चित्रकाराला स्वतःला अभिप्रेत असलेला एखादा आशय समृद्ध पणे किवा नेमके पणाने चित्रातून ,शिल्पातून मांडताना काही मर्यादा येत असतील तर त्याने त्या गोष्टी सिनेमा ,नाटक ह्या माध्यमातून व्यक्त कराव्यात." शेवटी कोणत्याही कलाकाराला भाषेचे माध्यमाचे बंधन नसावे किंबहुना कलाकाराने ते अंगीकारलेले नसावे .ठरविक क्षेत्र ,माध्यमाच्या कचाट्यात न अडकता त्याच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. हे त्याचे म्हणणे , माझे मत देखील हेच .त्यामुळे विचारांना विचारांची संमती मिळाली की मग अजुन काय हवे ? आम्ही बराच वेळ चित्र, शिल्प ,नाटक, सिनेमा ह्या विषयावर दीर्घकाळ चर्चा केली . उत्तम कडून नेहमी बरेच शिकण्यासारखे असते. तसे पाहावाया गेल्यास मी बर्यापैकी कानसेन आहे . एखादा कुणी कोणत्याही विषयाचे ज्ञान जर का देत असेल तर माझे कान सदैव तत्पर असतात . मग मी तासनतास देखील ते ऐकत बसेन.
बोलता बोलता मी म्हटले काय चाललेय सध्या तर तो म्हणाला अरे एका हिंदी सिनेमा साठी काम करतोय . कामानिमित्त मुक्काम गोरेगावच्या फिल्म् सिटी मध्ये आहे .तो संबोधला. त्या अनुषंगाने मग तो त्या सिनेमा बद्दल त्याच्या विशिष्ट शैलीत बोलु लागला ...कस असतय ना सुमन.... मी ह्यात काय विशेष काम केलाय ह्यातली काय गोष्ट नाही. (उत्तम नेहमीच जबरदस्त काम करतो मात्र बोलताना नेहमी म्हणणार, नाही रे ह्यात काय विशेष नाही. )सिनेमा चित्रकारावर आधारित आहे ,त्या तील प्रमुख कलाकर हा चित्रकार दाखवलाय . त्याला चित्र काढायला शिकवतोय सध्या .शिवाय त्यातील सर्व चित्रे मीच काढलीत . सिनेमा आणखीन छान बनवता आला असता रे ...परंतु शेवटी बॉलीवूड .....प्रेमप्रकरणातच अडकणार ..(त्यातून बाहेर पडणे त्यांस कठीण ...त्यामध्ये आर्थिक गणिते देखील असतात तो भाग वेगळा पण आपण भारतीय प्रेक्षकांस किती काळ त्यातच गुरफटून ठेवणार ह्याची खंत न त्या बॉलीवूड वाल्यांस न भारतीय प्रेक्षकांस ....)
म्हणाला अजून बरेच काम बाकीये ..तुला कळवेनच केव्वा रेलीज होतोय तो सिनेमा ..असे म्हणून उत्तम सिनेमा वरचे बोलायचे थांबला ..
हल्ली कुठल्या चित्र स्पर्धांमध्ये भाग घेत नाहीस ? मी विचारले ...त्यावर तो म्हणाला , नाहीरे ....मनासारखे काही होत्त नाहीये. सर्वत्र काहीतर अपूर्ण अपूर्ण वाटतेय ..सगळीकडे वर वरचे चित्रपहावयास मिळतेय ..खोल गर्तेत जाऊन विचार करून कुणी काही करताना दिसत नाहीय. नुसते प्रसिद्धीच्या मागे लागलेत सर्व..न विषयाची समज ,न खोलवर अभ्यास ,न तो करण्याची आस ,सगळंच कस उथळ उथळ ...उत्तम अगदी गंभीर होऊन बोलत होता ..आजूबाजूला असलेले वातावरण व त्यात होणारी घुसमट हि त्याच्या चेहेरयातून ,देहबोलीतून स्पष्ट जाणवत होती . तो म्हणाला माझे काहीतरी उत्तुंग ,भव्य असे करायचा विचार आहे ..मी पण त्याच्या बोलण्यात मग्न झालेलो....कारण त्याची ताकद मी चांगलीच जाणतो .नुसता बोलाचा भात आणि बोलाचीच कढी असा प्रकार तो बिलकुल नव्हता हे मी जाणून होतो. शेवटी गप्पा काही सरायचे नाव घेत नवत्याच..शेवटी त्याला आणि मला आम्हा दोघांना कामानिमित्त जाणे होते. त्यामुळे आम्ही एकमेकांची रजा घेवून निघालो ..
हे वर्षभरापुर्वीचे आजच लिहिण्याचा प्रपंच करण्याचा उद्देश हाच कि कालच उत्तम शी फोन वर बोलणे झाले .त्यावेळी तो म्हणाला अरे माझे काम असलेला म्हणजे चित्रकाराच्या लकबी ,कामाची पद्धत ,इत्यादींचे मार्गदर्शन मी मुख्य नायकाला केलेय. तसेच काही चित्रं ,रेखाटन ,पोट्रेट्स देखील केले आहे. तो हिंदी सिनेमा ह्या महिन्याच्या बारा तारीख ला प्रदर्शित होतोय ...पहा नक्की ...त्याचे नाव 'फितूर '...मी म्हणालो अरे नककी पाहीन...
चल भेटू पुंन्हा ...कालच पुण्यात आलोय ...असे म्हणून त्याने फोन ठेवला ...

तर सर्व चित्रकार मंडळीना हि विनंती ..उत्तमचे काम पहायची संधी सोडू नका ...
ती लय भारी संधी असलं ......................
सुमन दाभोलकर .
माझ्या बालपणातला ,शालेय जीवनातला बराचसा काळ ( उन्हाळी सुट्ट्या ,दिवाळी सुट्ट्या ) माझ्या मावशी कडे म्हणजे 'गोव्यात 'गेला. गोवा माझ्यासाठी बरेच सवयीचे आहे.गोव्यातले कल्चर मला फार आवडते ..तिथली भाषा ,लोकांचे वागणे ,बोलणे सर्वकाही ..सहजता असते त्यामध्ये .हे सर्व सांगण्या मागचा उद्देश हाच की काल जो संगीत प्रधान सिनेमा पाहिला ,आणि जुन्या आठवणी डोळ्या समोर तरळल्या.संगीत प्रधान नाटक पहायची सवय गोव्यातच लागली .त्याला कारणीभूत माझे भाऊ,बाळू दादा ,बिंदेश ,योगेश व काका (मावशीचे मुले ,पति )हे चांगले कलाकार त्यांची गायकी असो वा तबला वादन ,हार्मोनियम अगदी लाजवाब.तिथे तर छोट्या छोट्या गावात त्यातल्या वाडीतून देखील संगीत नाटकं सादर केली जातात ,विशिष्ट प्रसंगी म्हणजे जत्रा ,उत्सव ईत्यादि..फार ताकदीचे कलाकार असतात ,अगदी अप्रतिम.मुळात त्या कलाकारांमध्ये दिसून येते ती उस्फूर्तता कलेबद्दल चे प्रेम,आस्था ........
असो आता मूळ मुद्द्यावर येतो..
तसे मी निवडक च सिनेमे पाहतो ,(नेहमी क्वान्टिटि पेक्षा क्वालिटी जास्त आवडते मला.)
संगीत प्रधान नाटकं मला फारच भाव तात ,आवडतात.हे नाटक पाहीलेच होते पूर्वी मी ,परंतु काही महिन्यांपूर्वी कानांवर आलेले की ह्या नाटकावर आधारित सिनेमा पण बनतौय, त्यात सूबोध भावे अभिनया बरोबर दिग्दर्शन ही करणार होता ,म्हटले काहीतरी मस्त पहावयास मिळेल.(त्याचे अभिनय असलेले 'बाल गंधर्व ','लोकमान्य टिळक' हे सिनेमे ..त्यामुळे त्याजकडून अपेक्षा ही बऱ्याच वाढल्यात .)
त्याच प्रतिक्षेत मी होतो .आणि काल तो योग जुळून आला. काल "कट्यार काळजात घुसली" हा सिनेमा पाहिला अगदी 'अप्रतिम ''अप्रतिम' 'अप्रतिम' .....
सिनेमास जाण्यापूर्वी डोक्यात विचारसत्र घोळत होते सिनेमा संदर्भातले ,पहिलाच डोळ्यासमोर आला सचिन पिळगांवकर(महागुरू )हा तर माझ्या डोक्यातच जातो .किती ती ओव्हर अॅक्टीग महागुरूची ,म्हटल हा आता काय काय अति करतोय हे तोच जाणे ..चेहेऱ्यावर नेहमी चित्र विचित्र हावभाव असतात त्याच्या ..म्हणून थोडासा मी त्याला दबुनच होतो . म्हटले हा माती खाणार .पूर्ण सिनेमाचा सत्यानाश करणार ,शंकर महादेवन .....म्हटले आता हा काय अभिनय करणार ? ,त्यात आणखीन भर म्हणजे ती अमृता खानविलकर .फक्त त्या सूबोध भावे वर भरवसा म्हणून ही रिस्क घेतली होती सिनेमा पहायची .
परंतु माझे सर्व पूर्व ग्रह दूषितच ठरले ,ज्याला मी राखीव खेळाडू म्हणत होतो तोच चक्क आज सामनावीर ठरला होता .तो म्हणजे 'सचिन पिळगांवकर 'अप्रतिम अदाकारी ,जबरदस्त अभिनय उर्दू भाषा अस्खलीतपणे जिभेवर नाचत होती त्याच्या... 'वाह क्या बात है ,'सूबोध भावे जबरदस्त अभिनय,तेवढ्याच ताकदीचे दिग्दर्शन ,अमृता खानविलकर ,शंकर महादेवन सारेच अप्रतिम जुळुन आले होते .त्यातली गाणी राहुल देशपांडे ,महेश काळे ,शंकर महादेवन अगदी लाजवाब .(विशेष करून राहुल देशपांडे ...माझ्या आवडीचा शास्त्रीय गायक)
गाणी ऐकतांना तर माझ्या अंगावर काटा येत होता.ईतकी ताकद त्यात होती .(नाहीतर आजकाल ची हिंदी गाणी काटा सोडाच छापा देखील येत नाही असो .)कदाचित मला शास्त्रीय संगीत आवडत असेल म्हणून ही असे झाले असावे ,मी त्या गाण्यांत शिरतो अक्षरश: परंतु हा सिनेमा ही कानसेनांन साठी मस्त मेजवानिच आहे .पण ह्या वरून एक जाणवले ते म्हणजे कलाकार जर ताकदीचा असेल आणि त्याच्या वाट्याला जर का योग्य भूमिका आली तर तो त्याचे सोनं केल्याशिवाय रहात नाही .हे ह्या सिनेमातून जाणवले.सचिन च्या वाट्याला आजतागायत अशी भूमिका आली नसावी बहुधा .हे वाटण्या मागचे कारण त्याचा ह्या सिनेमातील अप्रतिम अभिनय .असेच अभिनय पहावयास मिळाले तर प्रेमाचे टुकार सिनेमे पहायची गरजच भासणार नाही कुणास.
पलसाने चा कँमेरा,संतोष फुटाणे यांचे नेपथ्य सारेच लाजवाब .तो काजव्या चा सीन आहा तो स्पेशल ईफेक्ट ...बरेच काही लिहिता येईल ..

प्रत्येकाने आवर्जून पहावा .
No comments:
Post a Comment